• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वारीमध्ये पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर द्यावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2022
in मुख्य बातमी
0
वारीमध्ये पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर द्यावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आषाढी वारीसाठी विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातूनही लाखो भाविक पंढरपुरात येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाबाबत संबंधित विभागाच्या आढावा बैठकीत श्री शंभरकर बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांत अधिकारी गजानन गुरव, अप्पासाहेब तुपसमिंदर यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत यंदा मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्याने नगरपालिका प्रशासनाने स्थानिक लोकसंख्या विचारात घेऊन स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात करावा. तसेच 65 एकर पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी मुबलक प्रमाणात शौचालयाची व्यवस्था करावी. याचबरोबर तात्पुरते शौचालय उभी करून त्याच्या वेळच्या वेळी स्वच्छतेसाठी यंत्रणा उभी करावी, वेळोवेळी पाहणी करावी. ज्या मठ प्रमुखाने तात्पुरत्या शौचालयाची मागणी केली असेल त्यांना उपलब्ध करून द्यावीत. वारी कालावधी मध्ये वारकऱ्यांना गॅस वितरण व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता गॅस वितरण कंपनीने घ्यावी.

यात्रा कालावधीत अन्नपदार्थामध्ये भेसळ होणार नाही याची अन्न व औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी. 3 जुलैपासून शहरातील हॉटेल्स, प्रसाद दुकाने याची वेळोवेळी तपासणी करावी. दोषी आढळलेल्या व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. अन्नातून विषबाधा होणार नाही, शिळ्या अन्न वारकऱ्यांना देऊ नये, याबाबत मठ प्रमुखांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात. पंढरपूर शहर, पालखी मार्ग येथील औषध विक्री दुकाने दिवस-रात्र सुरू राहतील, याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशाही सूचना श्री शंभरकर यांनी केल्या.

महावितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, शहरात अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी. जलसंपदा विभागाने यात्रा कालावधीत भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत नियोजन करावे. जेणेकरून वारकऱ्यांना चंद्रभागा स्नानासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच नदीपात्रातील वाहतूक करणाऱ्या होड्यांना सुरक्षितेच्या बाबतीत आवश्यक त्या सूचना द्याव्यात.

                आवश्यक त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था करावी. याठिकाणी तज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. नवीन बसस्थानकावर पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या आहेत, पाण्याच्या सुविधेसाठी एसटीचे टँकर घ्यावेत, अशा सूचनाही श्री शंभरकर यांनी दिल्या.

अपर जिल्हाधिकारी श्री जाधव यांनी सांगितले कि, वारी कालावधीत सर्व मोबाईल जॅम होतात. संपर्कासाठी फोनची सुविधा खंडित होऊ नये.यासाठी बीएसएनएलने टॉवरची क्षमता वाढवून 21 ठिकाणी हॉटलाइन सुविधा द्यावी.

हिंमत जाधव म्हणाले, गॅस वितरण आणि डिलेव्हरीच्या ठिकाणी रेस्क्यू टीम ठेवावी. मोबाईल सेवेसाठी विविध कंपनीचे मोबाईल व्हॅन टॉवर राहणार आहेत.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व विभागांनी पूर्ण तयारी करण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक विभागाने केलेली तयारी सादरीकरणातून मांडली.

Previous Post

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण होणार जुलैच्या पहिल्या आठवड्यात

Next Post

योगाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाने केले योग दिंडीचे आयोजन

Related Posts

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
Next Post
योगाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाने केले योग दिंडीचे आयोजन

योगाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाने केले योग दिंडीचे आयोजन

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026