योगाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाने केले योग दिंडीचे आयोजन

0
22

सोलापूर : मानवतेसाठी योग हे ब्रीद वाक्य घेऊन आठव्या आंतरराष्ट्रीय योग साजरा करण्यात येत आहे या दिनाचे औचित्य साधून शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व आयुष संचलनालय मुंबई यांच्या निर्देशानुसार आयुर्वेद महाविद्यालयात योग सप्ताहाचे आयोजन करण्यात करण्यात आहे. या योग सप्ताहात अनेक तज्ञ व मान्यवर व्यक्तींचे योग या विषयावर व्याख्यान व योगाची प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून आज महाविद्यालयात योग दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.सदर दिंडीची सुरुवात महाविद्यालयापासून झाली व सम्राट चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीवेस मार्गे हुतात्मा चौक (चार पुतळा) चौकापर्यंत काढण्यात आली.या योग दिंडीला प्राचार्य डॉ.वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ.शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी श्री अनुप दोशी,स्वस्थवृत्त व योग विभागाचे प्रमुख डॉ.अमोल वेल्हाळ, रा.से.यो कार्यक्रमाधिकारी डॉ.शिल्पा येरमे यांनी हिरवा झेंडा दाखवून दिंडीला सुरुवात झाली.योग दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योगा चे महत्व जन सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी ,जनजागृती होण्यासाठी घोषणा दिल्या तसेच वेगवेगळी घोषणा फलके तयार करण्यात आली होती. या दिंडीत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर दिंडी ही स्वस्थवृत्त व योग विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजादी का अमृत महोत्सव यांच्या पुढाकाराने काढण्यात आली.