• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात आजपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठात आजपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह!
0
SHARES
1
VIEWS

समता, ज्ञान आणि प्रबोधनाचा होणार जागर

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनपर उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे विद्यापीठ परिसरात समता, बंधुता आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला जाणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासनाचे समन्वयक डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम मालिकेची सुरुवात बुधवार, ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन आणि सप्ताहाच्या उद्घाटनाने होणार आहे. याच दिवशी ज्ञानस्रोत केंद्रात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून, हे प्रदर्शन १४ एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना सामाजिक चळवळींचा अभ्यास करण्याची ही उत्तम संधी ठरणार आहे.

९ एप्रिल रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने संत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात येणार असून, त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येईल. पर्यावरण संवर्धनासोबत सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यामधून दिला जाणार आहे. याच दिवशी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले : जीवन व कार्य’ या विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १० एप्रिल रोजी विद्यापीठ परिसरात पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे.

११ एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सामाजिकशास्त्रे संकुल सभागृहात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. दुष्यंत कटारे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी सलग १८ तास वाचन अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात राज्यसभेचे नूतन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचे विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या सप्ताहाची सांगता १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात येणार आहे. विद्यापीठातील विविध विभागांच्या समन्वयातून आयोजित या कार्यक्रममालिकेत विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

TOP 25 । सोलापुरातील ‘तो’ 3.52 कोटींचा रस्ता आयुक्तांच्या रडारवर..कारंजे, आकुलवार यांना नोटिसा..!

Next Post

बांधकाम परवाने रखडले आणि कामे खोळंबली……!

Related Posts

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!
मुख्य बातमी

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!
मुख्य बातमी

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026
TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!
मुख्य बातमी

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

May 24, 2026
TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

May 23, 2026
अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना
मुख्य बातमी

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

May 23, 2026
आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द
मुख्य बातमी

आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द

May 22, 2026
Next Post
बांधकाम परवाने रखडले आणि कामे खोळंबली……!

बांधकाम परवाने रखडले आणि कामे खोळंबली……!

ताज्या बातम्या

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026