खुल्या गटात मानस गायकवाड अजिंक्य;११ व ७ वयोगटात श्रेयस, नमन, संस्कृती, निवा विजेते
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहर व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वरिष्ठ, ११ व ७ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात अग्रमानांकीत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड याने स्पर्धेत सहा पैकी सहा गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच अनुभवी विशाल पटवर्धन, मंगळवेढ्याचा स्वप्नील हदगल, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे यांनी सुरेख खेळ अनुक्रमे द्वितीय, तिसरा व चौथा क्रमांक पटकावित वरिष्ठ संघातील आपले स्थान निशित केले. तसेच श्रेयस कुदळे, नमन रंगरेज, संस्कृती जाधव, निवा बुरटे यांनी आकर्षक खेळ करत ११ व ७ वर्षाखालील गटात जेतेपद पटकाविले. तसेच ओम राऊत, विवेक स्वामी, प्रीशा भांगे व ईशा पटवर्धन यांनीदेखील उत्कृष्ट खेळ करत उपविजेतेपद प्राप्त केले.
फडकुले सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ नेते आनंद मुस्तारे, संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील, सोमनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात संतोष भाऊ यांनी खेळाचे महत्व विषद करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर जिल्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना रुपये हजार रुपये रक्कम देण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक व मेडल्स मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे तर त्यांना सहाय्यक म्हणून रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, यश इंगळे यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले.
अंतिम निकाल खालीलप्रमाणे (अनुक्रमे गुण व बोकोल्स गुणांसह):
खुला गट: मानस गायकवाड – ६, विशाल पटवर्धन – ५ (१९), स्वप्नील हदगल – ५ (१८), स्वराली हातवळणे- ५ (१७), रणवीर पवार – ४.५ (२०), ओम चिनगुंडे- ४.५(१८.५), नविना वडिशेरला – ४.५ (१३.५), चंद्रशेखर बसर्गीकर – ४ (२२), वरद लिमकर – ४ (२१.५), सृष्टी गायकवाड – ४(२१)
११ वर्षे (मुले): श्रेयस कुदळे – ६, ओम राऊत – ५ (२१), वेदांत मुसळे – ५ (१९), श्लोक चौधरी – ५ (१८), सार्थक राऊत – ४.५, देवदत्त पटवर्धन – ४ (२३), रुद्र बाबर – ४ (२०), विहान कोंगारी – ४ (१७.५), आयुष जानगवळी- ४(१७), विहान राठोड- ४(१६.५)
११ वर्षे (मुली): संस्कृती जाधव – ५, प्रीशा भांगे – ४, सृष्टी मुसळे – ३.५, पृथा ठोंबरे – ३ (१४.५), दुर्वा महिंद्रकर – ३ (१३), वेदिका स्वामी – ३ (११), लीला नागटिळक – ३ (११), प्रचीता मांतगे – ३ (१०), मनस्वी क्षीरसागर – ३ (८), आराध्या मांतगे – २.५
७ वर्षे (मुले): नमन रंगरेज – ४, विवेक स्वामी – ३(९), रत्नेश घानेगावकर- ३(६.५), पार्थ भांगे – ३(६), नियान कंदिकटला- ३(४.५), आर्यन गांधी – २(८), आद्विक ठोंबरे- २(७.५), जीवन गड्डम – २(७.५), ओजस बाली- २(७), आदित्य जानगवळी- १
७ वर्षे (मुली): निवा बुरटे – ३, ईशा पटवर्धन – २(५), स्वरांजली जाधव – २(३), मिष्का चिट्टे- १(५), प्रिशा पवार – १(५), स्वरा वगरे
उत्तेजनार्थ: श्री जोशी, नैतिक होटकर
जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी खेळाडूंसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार जेष्ठ नेते आनंद मुस्तारे, सुमुख गायकवाड,सोमनाथ शिंदे अतुल कुलकर्णी, संतोष पाटील, उदय वगरे, रोहिणी तुम्मा