सोलापूर : अनुभव प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने यशस्विनी महिला पुरस्कार सोहळा रविवार दि ९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता शिवस्मारक सभागृहात,नवी पेठ येथे पार पडला.यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्नेहदीप पब्लिक स्कूलचे संचालिका सौ.स्नेहा पाटील,वरीष्ठ उपअभियंता MSEB निवृत्त श्री सिद्धाराम दुधनी,प्राध्यापिका, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय डॉ. गायत्री देशपांडे,जेष्ठ नागरिक संघ सचिव श्री मन्मथ कोनापुरे,प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री महेश भाईकट्टी,महिला अध्यक्ष सौ.श्वेता कालदीप आदी उपस्थित होते.
महिला दिन एक दिवस नसतो ते वर्षभर असतो.स्त्रियांनी समाजाला एक नवीन दिशा दिली आहे. प्रत्येक स्त्री ही माते समान असते.आधुनिक काळात स्त्री ने स्वताचे निर्णय स्वतःच घेतले पाहिजे.महिलांसाठी संस्था नेहमी प्रेरणादायी काम करत आहे.प्रतिष्ठान चे काम उल्लेखनीय कार्य आहे.असे मत स्नेहा पाटील यांनी मांडले.
प्रत्येक महिलांनी जबाबदारी घेऊन काम करत असतात.आणि प्रत्येकाने काम करत असताना प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करावे. प्रतिष्ठानच काम पाहत असताना अभिमान वाटतो. या तरुणाचा कौतुक करावे तेवढे कमीच आहे.असे मत श्री सिद्धाराम दुधनी यांनी मांडले.
सूत्रसंचालन गणेश येळमेली यांनी केले. आभार प्रदर्शन कविता येळमेली यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
दिव्या कालदीप,संगीता नागणसुरे,कोमल लोणी,मीनाक्षी शिवशिंपी,सुनंदा भाईकट्टी अभिषेक दुलंगे,शिवानंद नागणसुरे,गणेश कालदीप,सचिन लोणी,शिवानंद भाईकट्टी,संतोष शिवशिंपी,सोमनाथ कालदीप, हरीश आमणे,प्रसाद कालदीप,संदीप भाईकट्टी आदी परिश्रम घेतले.
या मान्यवरांचा झाला पुरस्काराने सन्मान
1)सौ अस्मिता अंबुरे (आर्किटेक्चर)
2) सौ.संगीता मुनावळी (शिक्षिका)
3) श्रीम.अंबिका कनबसे
(महिला पोलीस )
4)सौ.राणी भंडारे (सरपंच,वलाडी)
5) सौ.उज्वला अ.लोखंडे (डॉक्टर)
6) सौ प्रांजली मोहीकर (समाजसेविका)
7) सौ. आरती कुसेकर (पत्रकार)
8) सौ. ऋतुजा लिमये (कलाक्षेत्र )
9) सौ पल्लवी वाले (उद्योजिका)
10)सौ.माधुरी मोरडे (वकील)
आदी या पुरस्काराचे मानकरी आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे पहिले वर्ष आहे..












