सोलापूर: अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे वर्षभर महापुरुषांची जयंती व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थेच्या सदस्याच्या वाढदिवसाचा आनंद सदैव इतरांना सोबत वाटून आनंद व्दिगुणीत करून समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन जयंती व वाढदिवस साजरा केला जातो.
महावितरण सोलापूर शहर ई उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

नागेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक २९, जय भवानी प्रशाला, भवानी पेठ, सोलापूर येथे मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी प्रदीप मोरे यांनी अपरिचित सामाजिक संस्थेचे कार्य हे प्रेरणादायी असतातच पण समाजोपयोगी पण असतात. आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप केले हे प्रेरणा देणारे आहेत व सदैव सामाजिक कार्यासाठी अपरिचित सामाजिक संस्थेच्या पाठिशी राहिन असे मत व्यक्त केले.
यावेळी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन सोलापूर शहर विभाग सचिव बालाजी जाधव, अपरिचित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मयुर गवते, आनंद फुलारी, शाळेचे मुख्याध्यापक गणेश धनवटे सर, अविनाश हिंगाने सर, मिलिंद राऊळ, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते.