बालाजी अमाईन्सकडून शालेय साहित्यांचे वाटप

0
27

दि. २५/०८/२०२३ रोजी बालाजी अमाईन्सकडून सीएसआर अंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ४० शाळांना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य व बेंचेस इत्यादी वस्तूंचा समावेश होता.

या कार्यक्रमाप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे अध्यक्षस्थानी होते, प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे आणि केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी श्री अंकुश चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी बालाजी अमाईन्सचे कौतुक केले आणि ज्या गोष्टी प्रशासनास साध्य करण्यास वेळ लागतो त्या गोष्टी कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून खूप कमी वेळात पूर्ण केले असून समाजातील त्यांचे काम उल्लेखनीय असल्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली. मनीषा आव्हाळे आणि अंकुश चव्हाण यांनीदेखील कंपनीने करत असलेल्या कामाचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व शाळांना मिळालेल्या वस्तूंचा व्यवस्थित वापर करण्याचे आव्हान केले.

यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, संचालक एन. राजेश्वर रेड्डी, स्वतंत्र संचालक डॉ. सुहासिनी शहा व डॉ. उमा प्रधान आणि तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार उपस्थित होते.

हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, रामवाडी, जळकोट, हंगरगा, केशेगांव, नाईकनगर, नळदुर्ग, वडगांव, दुत्ता, धाराशिव, सोलापूर शहर, सावळेश्वर, बीबीदारफळ, रानमसले, नांदणी, वळसंग, बिरवडे, वाफळे, उजनी, यतनाळ, मंद्रूप, या गावातील ४० शाळांनी शैक्षणिक साहित्य स्वीकारले.

शाळानिहाय केलेल्या साहित्यांचे वाटप खालीलप्रमाणे आहे.

धाराशिव जिल्हा

१. नगरपरिषद प्रा. शाळा क्र. २, तुळजापूर – २० बेंचेस

२. जि. प. प्राथमिक प्रशाला, नळदुर्ग – २५ बेंचेस

३. लाल बहाद्दुर मागास समाज सेवा मंडळ, उमरगा – ३० बेंचेस

४. जि. प. प्राथमिक प्रशाला, हंगरगा – ३० बेंचेस

५. राजीव गांधी विद्यालय, हंगरगा – २० बेंचेस

६. साने गुरुजी विद्यालय, केशेगांव – २५ बेंचेस

७. जय तुळजाभवानी माता प्रा. आश्रम शाळा – १० बेंचेस

८. राम वरदायिनी प्रा. विद्या मंदिर, तुळजापूर – ४० बेंचेस

९. श्री एस. पी. हायस्कुल, वडगाव – २० बेंचेस

१०. धुत्ता माध्यमिक विद्यालय, धुत्ता – २० बेंचेस

११. जि. प. प्राथमिक प्रशाला, चिंचोली – १ संगणक

१२. जि. प. प्राथमिक प्रशाला, रामवाडी – १ संगणक

१३. नगरपरिषद प्रा. शाळा क्र. ३, तुळजापूर – २ संगणक

१४. तुळजाभवी सैनिक माध्यमिक विद्यालय – २ संगणक

१६. महात्मा गांधी विद्यालय, उजनी – प्रयोगशाळा साहित्य

सोलापूर जिल्हा

१. चांद तारा उर्दू प्राथमिक शाळा सोलापूर – १ संगणक

२ न्यु कस्तुरबा मराठी विद्यालय. सोलापूर – १ संगणक

३ गंगाराम देशमुख महानगर पालिका शाळा देशमुखवस्ती सोलापूर – १ संगणक

४ महानगर पालिका मुलंची शाळा क्रमांक 27 जय मल्हार चौक सोलापूर – १ संगणक

५ एस लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ट महाविदयालय मंद्रुप – २ संगणक

६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदनी दक्षिण सोलापूर – १ संगणक

७ सुरा मुलींची प्रशाला सेवासदन सोलापूर – १ इंटरॅक्टिव्ह बोर्ड

८ कै. आशाय्या ईरय्या अरकाल सोलापूर – १ प्रोजेक्टर

९ गैबीबी पीर उर्दू स्कूल, सोलापूर – १ प्रोजेक्टर

१० जि.प.प्राथमिक शाळा लोकमान्यनगर सोलापूर – १ स्मार्ट टीव्ही

११ सेवासदन ज्युनियर कॉलेज सोलापूर – पीएएस सिस्टिम

१२ शक्ती प्राथमिक आश्रम शाळा मुळेगाव तांडा, दक्षिण सोलापूर – २० बेंचेस

१३ श्रीजगदंब विद्यालय वाफळे – २० बेंचेस

१४ वरवडे हायस्कूल, विरवडे (बीके) – २० बेंचेस

१५ लोकनेते DN. गायकवाड माध्यमिक विद्यालय बक्षीहप्परगे – १५ बेंचेस

१६ श्री ब्रह्मगायत्री विद्यामंदिर कृषी व कनिष्ठ महाविद्याल रानमसले – २५ बेंचेस

१७ उर्दू माध्यमिक विद्यालय मंद्रुप दक्षिण सोलापूर – २० बेंचेस

१८ समता हायस्कूल व जुनियर कॉलेज सावळेश्वर मोहोळ – २० बेंचेस

१९ लोकसेवा विद्यालय आगळगाव ता. बार्शी – ४० बेंचेस

२० झेडपी प्राइमरी स्कूल, बीबी दारफळ – १ स्मार्ट-टीव्ही, पीएएस सिस्टिम

२१ हिंगुलाबिका प्राथमिक शाळा सोलापूर – १ संगणक

२२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलसांग दक्षिण सोलापूर – १ संगणक

२३ कै. व्हीके गुत्तेदार हायस्कूल यत्नल दक्षिण सोलापूर – २० बेंचेस

२४ कै. मातोश्री मलकव्वा बिराजदार पाटील प्रशाला सोलापूर – १५ बेंचेस

२५ साईबाबा विद्यामंदिर दहीटणे सोलापूर – २ संगणक