शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

0
45

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता नवा विषय पुढे आले आहे. 34 महिने डिसले गुरुजी तरीही त्यांचा पगार दिला कसा असा मोठा प्रश्न निर्माण झाला असून तो पगार जिल्हा परिषद वसूल करणार आहे. एवढेच नव्हे तर सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी रणजीत सिंह डिसले यांच्या ग्लोबल टीचर अवार्ड वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अवॉर्ड कोणी ? दिला कसा मिळाला ? आमच्या झेडपीकडे तर काहीच माहिती नाही तुम्हीच शोध लावा इंटरनेटवर पहा त्यांचे नाव देखील यादीमध्ये नाही ! असे गंभीर वक्तव्य शिक्षण अधिकारी लोहार यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर डिसले गुरुजी यांनी चुकीचे रिपोर्ट दिले. परितेवाडी च्या शाळेमध्ये आदिवासी मुलांना शिकवले असा त्यांनी चुकीचा अहवाल केला. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तसेच सिंहगड संस्था आणि परितेवाडी या तीनही ठिकाणी ते गैरजर होते याबाबत चौकशी सुरू आहे बघू काय होते मी सर्व चौकशी करून सीईओ साहेबांकडे देणार आहे असे देखील लोहार म्हणाले. शिक्षणाधिकारी लोहार यांनी डिसले गुरुजींच्या पुरस्कारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे आता नवा वाद पुढे आला आहे.