• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रमातून देवेंद्र कोठेंनी सोडविल्या जनतेच्या अडचणी…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2025
in इतर घडामोडी
0
‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रमातून देवेंद्र कोठेंनी सोडविल्या जनतेच्या अडचणी…
0
SHARES
0
VIEWS

मतदारसंघातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार : नागरिकांनी केले कौतुक

सोलापूर – शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी स्तुत्य पुढाकार घेत ‘आमदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी एकता नगर, कर्णिक नगर, पद्मनगर सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेत या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही सुरू केली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या या पुढाकाराचे नागरिकांनी कौतुक केले.

विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देवेंद्र कोठे यांनी ‘देवयज्ञ’ हा जनता दरबार नियमितपणे भरवत नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्रारंभ केला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून देवयज्ञबरोबरच आता ‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमातून नागरिकांना आमदार देवेंद्र कोठे यांना थेट भेटून विकासकामांच्या मागण्यांची निवेदने सादर करता येणार आहेत.

एकता नगर सभागृहात आयोजित या उपक्रमाप्रसंगी कर्णिक नगर भाग एक ते तीन, एकता नगर व पद्म नगर येथील नागरिकांच्या भेटी घेत भागातील महिलांच्या, ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेतल्या. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वासहतींना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या शर्तभंग, बी टू हस्तांतरण यासारखे सोसायटीचे प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द आमदार कोठे यांनी दिला.

या भागातील रस्ते, ड्रेनेज, लाईट, उद्याने, त्याच सोबत परिवहन सेवेबाबतची नागरिकांची निवेदने स्वीकारली आणि प्राधान्याने विकास कामांसाठी निधी देऊन भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. श्री आदिशक्ती देवी मंदिर आणि परिसराची आमदार कोठे यांनी नागरिकांच्या सोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

याशिवाय आमदार देवेंद्र कोठे यांनी पद्मनगर क्रीडांगण येथे भेट देऊन तेथील बास्केटबॉल मैदानाची पाहणी करून संबंधित प्रशिक्षक, खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बास्केटबॉल मैदानाच्या दुरुस्ती तसेच सुविधांसाठी निधीची पूर्तता करण्याचे व संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांकडे पाठपुरवा करून कामे तात्काळ मार्गी लावण्याची तसेच वॉकिंग ट्रॅक आणि मैदानातील इतर दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली.

यानंतर क्षेत्र भेटीचा भाग म्हणून वजर्श्वेरी नगर येथे गेले असता, आमदार देवेंद्र कोठे यांनी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. विविध विषयांवर डोंगरे यांच्याशी चर्चा करून या भागातील माता-भगिनींशी देखील आमदार कोठे यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या आणि समस्यांचे निवारण लवकरात लवकर होईल असे नागरिकांना आश्वस्त केले.

‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, रामेश्वरी बिर्रु, गुरुशांत धुत्तरगांवकर, भाजपा शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, नागेश सरगम, सुरेश चिक्काळी, दत्तात्रय पोसा, भीमाशंकर जवळे, धनराज जानकर, बंटी क्षीरसागर, एकता नगर सोसायटी चेअरमन विष्णू माने, सचिव….. हेणे, अंबादास इंदापुरे, शशिकला कस्पटे, रमेश माने, नंदकुमार बंडगर, अजय कुलकर्णी, कर्णिक नगर सोसायटी चेअरमन धावरू राठोड, तुळशीदास जाधव, राजा जोशी,जोगधनकर, पद्मनगर सोसायटीचे ॲड.श्रीनिवास क्यातम, लक्ष्मीनारायण कुचन,आडम, श्रीनिवास दिड्डी, अनिल देसाई, राहुल उपाध्ये, सुनील देसाई,,दातार,ज्ञानेश्वर गवते, शिवा संगा, प्रभाकर यादगिरी, श्रीशैल शेळे, काशिनाथ मोगली, प्रसन्न जवंजाळ, नामदेव जवंजाळ, राजेश चौरे, रामचंद्र गवते, नरेंद्र मिसालुल तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रम राहणार नियमित

देवयज्ञ या जनता दरबारा बरोबरच ‘आमदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम नियमितपणे सुरू राहणार आहे. या उपक्रमातून मतदारसंघातील नागरिकांच्या परिसरात जाऊन तेथील अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या सोडवण्यावर भर देण्यात येईल.

  • देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Previous Post

आजच्या राजकीय परिस्थितीत छावा चित्रपटाचा धडा तंतोतंत लागू होतो-रोहित पवार..

Next Post

महिला व शिशु रुग्णालय चे वीर राणी कित्तूर चेन्नमा हॉस्पिटल असे नामकरण करावे-लिंगायत समाजाची मागणी |

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
महिला व शिशु रुग्णालय चे वीर राणी कित्तूर चेन्नमा हॉस्पिटल असे नामकरण करावे-लिंगायत समाजाची मागणी |

महिला व शिशु रुग्णालय चे वीर राणी कित्तूर चेन्नमा हॉस्पिटल असे नामकरण करावे-लिंगायत समाजाची मागणी |

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026