• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माघी वारीसाठी सोलापूरातील दिंडयांचे पंढरपूरकडे प्रस्थान

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2022
in मुख्य बातमी
0
माघी वारीसाठी सोलापूरातील दिंडयांचे पंढरपूरकडे प्रस्थान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : माघ शुद्ध षष्ठी. सोलापुरातल्या मार्कंडेय मंदिरातून रविवार दि.6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता संत ज्ञानदेव आणि संत तुकारामांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा संपन्न झाला. 2009 पासून ही परंपरा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांच्या प्रेरणेने मोठया दिव्य स्वरूपात चालू आहे.

वारकरी संप्रदायात आषाढी आणि कार्तिकी या वारीबरोबरच माघी वारीही महत्त्वाची मानली जाते. माघ वारी सोलापूरकर वारकर्‍यांची वारी अशी विशेष ओळख आहे. सोलापुरातून अनेक वर्षांपासून माघी वारीसाठी अनेक दिंड्या जात असतात. परंतू 2009 साली अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांनी सोलापूरातील दिंडया  एकत्र आणून मार्कंडेय मंदिरातून पालखी प्रस्थान सोहळयाची सुरूवात केली.

त्यानंतर 2012 साली या पालखी सोहळ्याला रिंगण सोहळ्याची जोड देण्यात आली. आतापर्यंत सोलापुरातील होम मैदान, पार्क मैदान आणि नॉर्थ कोट मैदानावर हे रिंगण सोहळे पार पडले. तसेच पंढरपूर मार्गावर आणि पंढरपुरात प्रवेश करताना चार रिंगण सोहळे साजरे होत असतात. सोलापूरातील गोल रिंगण,कुरूल येथे गोल रिंगण,सुस्ते ता. पंढरपूर  येथे गोल रिंगण तसेच पंढरपूरात प्रवेश करताना उभे रिंगण अशी एकूण चार रिंगण पार पडतात. या पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांना सोलापूर महानगरपालिकेने काही वर्षे वीणा, चोपदारांचा पोशाख, तुळशी वृंदावन,मृदंग,टाळ,वारकरी पोशाख आणि अशा इतर अनेक वस्तू भेट देण्यात आल्या आहेत.

यावर्षी कोरोना सदृष्य परिस्थिती असल्याने  अखिल भाविक वारकरी मंडळाच्यावतीने वारकर्‍यांना  मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. 

श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी पुजन माघ शुद्ध शष्ठी दि.६ फेब्रुवारी रविवार रोजी श्री मार्कंडेय मंदिर येथे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव सुरेशजी फलमारी यांच्या शुभहस्ते व सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प.सचिन गायकवाड,ह.भ.प.दर्शन महाराज ढगे (श्री तुकाराम महाराज पालखी प्रमुख) ह.भ.प.विष्णुपंत मोरे महाराज(श्री संत तुकाराम महाराज मंदीर प्रमुख),ह.भ.प.निळोबा जांभळे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजन करण्यात आले.

यावेळी श्री मार्कंडेय दिंडी संस्था, श्री तुकाराम महाराज पालखी, श्री संत मुक्ताई प्रतिष्ठान, महदेव मंदिर लक्ष्मी चाळ भजनी मंडळ डोणगाव रोड, श्री मध्यवर्ती वारकरी संस्था, श्री नव मध्यवर्ती वारकरी संस्था, गुरुजीबुवा राशिनकर फड पाणीवेस भजनी मंडळ,श्री हनुमान भजनी मंडळ कोयनानगर, श्री बाबुराव सातारकर भजनी मंडळ,श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ गवळी वस्ती, श्री सदगुरु बाजीआण्णा मठ दिंडी संस्था, श्री दिगंबर महाराज भजनी मंडळ,श्रीमद गिता ज्ञानेश्वरी सेवा मंदिर, श्री वडार समाज माघवारी दिंडी संस्था, श्री बाल हनुमान भजनी मंडळ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जुनी मिल चाळ भजनी मंडळ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मातंग समाज भजनी मंडळ,श्री मातंगऋषी भजनी मंडळ,श्री कृष्ण भजनी मंडळ,श्री हनुमान भजनी मंडळ सलगर वस्ती, श्री जय हनुमान सेवा भजनी मंडळ बाळे,श्री निलकंठेश्वर मंदिर दिंडी संस्था, श्री राम मंदिर दिंडी संस्था शात्री नगर,श्री कृष्णप्पा महाराज दिंडी संस्था आदी भजनी मंडळ उपस्थित होते. तसेच दिंडीतील विणेकरी महाराजांचा पद्मसाली ज्ञाती संस्था यांच्या वतिने उपरणे,हारनारळ देवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी ह.भ.प.अभिमन्यू डोंगरे महाराज(म.रा.सदस्य ) ह.भ.प.बंडोपंत कुलकर्णी महाराज जि.उपा. (यांनी भजनाची सुरवात केली) ,ह.भ.प.ज्योतिराम चांगभले महाराज(जि.अ.),ह.भ.प.मोहन शेळके महाराज(जि.सचि.)ह.भ.प. संजय पवार महाराज (शहर अध्यक्ष),ह.भ.प.किरण श्रीचिप्पा महाराज (श.सह अ.),ह.भ.प.संजय पाटील महाराज(ता.द.अ.),ह.भ.प.बापुसाहेब कापसे महाराज(श.उपा.),ह.भ.प.दत्ताञय भोसले महाराज (श.सचि.)भ.प.गणेश वारे महाराज(श.सहसचि.),ह.भ.प.भाऊ मोरे महाराज,ह.भ.प.शिवाजी व्हनकडे सर,ह.भ.प.नागनाथ पाटील साहेब,ह.भ.प.यतिराज जाधव महाराज, विठ्ठल गायकवाड महाराज, नह.भ.प.नंदकुमार कोंगारे महाराज,ह.भ.प.निवृत्ती मोरे महाराज(श.सहको.),ह.भ.प.सुवर्णा गायकवाड,ह.भ.प.अनुसया व्हराडे,ह.भ.प.बाबुराव शिंदे महाराज,ह.भ.प.बाजीराव घुगे महाराज ,ह.भ.प.नामदेव पुलगम महाराज(श.को.)ह.भ.प,राकेश आन्नम महाराज(पु.वि.उपा.),ह.भ.प.सदाशिव चवरे महाराज,ह.भ.प.वासुदेव कुलकर्णी काका,ह.भ.प.हरीभाउ जावळे महाराज,ह.भ.प.ज्ञानेश्वर कोटा महाराज,ह.भ.प.राजु पुलगम महाराज ,ह.भ.प.अंबादास उदगेरी महाराज,ह.भ.प.राधवेंद्र आरकाल, ह.भ.प.पेंन्टा महाराज,ह.भ.प.विष्णूपंत आवताडे महाराज(श.प.वि.सल्ला),ह,भ.प.सुमंत शेळके महाराज तसेच अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचे सर्व अटी व नियमांचे पालन करत साठे चाळ महादेव मंदिर या ठिकाणी ह.भ.प.लक्ष्मण चव्हाण महाराज, ह.भ.प.सुरेशतात्या तोडकरी महाराज, ह.भ.प.दिनकर जगदाळे महाराज, ह.भ.प.विजय चोरमुले महाराज,यांच्या हस्ते समारोपाची आरती करण्यात आली.

Previous Post

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Next Post

‘लोकराजा’ हरपला; ‘नटसम्राट’ सुधीर कलिंगण यांचं निधन

Related Posts

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
Next Post
‘लोकराजा’ हरपला; ‘नटसम्राट’ सुधीर कलिंगण यांचं निधन

‘लोकराजा’ हरपला; ‘नटसम्राट’ सुधीर कलिंगण यांचं निधन

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026