₹ 2000 : नोटबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा

0
17

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने पहिल्या वेळी ज्या ‘उदात्त भावने’ने नोटाबंदी लादली, तोच प्रकार आता आहे. विरोधी पक्षांकडे 2024च्या दृष्टीने थोडेबहुत दोन हजारांच्या नोटांचे चलन राखून ठेवले असेल तर, ते बाद व्हावे व विरोधी पक्ष त्यादृष्टीने अडचणीत यावा, यापेक्षा दुसरा हेतू असू शकत नाही. दोन हजारांची नोटबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सामान्य जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही. सर्व राष्ट्रीय कामे बाजूला ठेवून पंतप्रधान कर्नाटकच्या निवडणुका, सभा व रोड शो घेतात व शेवटी त्यांचा पराभव होतो. त्या पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत दोन हजारांची नोटाबंदी जाहीर केली जाते, पण त्यांच्या निर्णयाने यावेळी ना खळबळ माजली, ना सळसळ झाली. कर्नाटकच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून दोन हजारांच्या गुलाबी नोटांचा अफाट वापर झाला, पण दोन हजारांची मात्रा चालली नाही. त्या चिडीतूनही ‘दोन हजारांची नोट बाद’ असा निर्णय झालेला असू शकतो, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखातून केली आहे.