DCC बँकेचे बुडवे : आर्यन शुगर २९६ कोटी, दीपकआबा १०१, सिद्रामप्पा १३२ तर मोहिते पाटील ८९ कोटी

0
10

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात डीसीसी बँक अजूनही गाळातच आहे बड्या राजकीय ठकांनी खूप मोठ्या रकमा थकविल्यामुळे ही बँक अजूनही आर्थिक अडचणीतच आहे. त्यामुळे या बँकेवर प्रशासक लागू करण्यात आला आहे. राजकारणी लोकांशी संबंधित असलेल्या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटीकडे तब्बल ९५० कोटी रुपये थकले आहेत. बार्शीचे दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगर या कारखान्याकडे डीसीसी बँकेचे तब्बल २९६ कोटी रुपये थकले आहेत. सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे यांच्या सांगोल्या कारखान्याकडे तब्बल १०१ कोटी रुपये तर अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम आप्पा पाटील यांच्या स्वामी समर्थ साखर कारखान्याकडे 132 कोटी रुपये थकले आहेत अकलूजच्या मोहिते पाटलांच्या शंकर सहकारी साखर कारखान्यांनी ८९ कोटी रुपये थकविले आहेत. त्यामुळे या कारखानदारांनी सोलापूरची डीसीसी बँक अडचणीत आणली आहे . शासन पातळीवर कठोर निर्णय घेऊन थकबाकी ठेवणाऱ्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर टाच आणावी असा सूर सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे तरच डीसीसी बँक वाचणार आहे नाहीतर शेतकऱ्यांची ही बँक कोणत्याही क्षणी बुडेल हे मात्र नक्की