• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

Yes News Marathi by Yes News Marathi
May 6, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात १५९० रुग्णांना सुमारे १२ कोटी ८६ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

         महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.

        मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.

२० गंभीर आजारासाठी मदत-
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थसहाय्य दिले जाते.

सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा :
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.
आर्थिक वर्षातील मदत

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील १५९० रुग्णांना सुमारे १२ कोटी ८६ लाख ६ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया-
संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गरजू व पात्र रुग्णांना वेळेत वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळत आहे. गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
रामेश्वर नाईक
कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

Next Post

7/12 होणार बंद

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
7/12 होणार बंद

7/12 होणार बंद

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026