• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

by Yes News Marathi
May 9, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- एम.सी.ए. (MCA) द्वारे आयोजित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाने कमालीची कामगिरी करत डी.ए.आर.सी. (DARC) संघाचा १० गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डी.ए.आर.सी. संघाने २० षटकांत ४ बाद १०३ धावा केल्या होत्या. ईशा घुलेने ६० चेंडूत १२ चौकारांसह शानदार ७५ धावांची खेळी केली, मात्र इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सोलापूरकडून गोलंदाजीत अमृता गव्हाणेने ४ षटकांत १७ धावा देऊन १ बळी घेतला.
१०४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सोलापूरच्या सलामीवीरांनी डी.ए.आर.सी.च्या गोलंदाजीचा समाचार घेतला. आर्या उमापने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ५४ धावा केल्या, तर साक्षी वाघमोडेने ४९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ४१ धावांची खेळी केली. सोलापूरने १७.२ षटकांत एकही गडी न गमावता १०४ धावा पूर्ण केल्या आणि विजय मिळवला. उत्कृष्ट फलंदाजीसाठी साक्षी वाघमोडेला ‘सामनावीर’ (Player of the Match) पुरस्काराने गौरविण्यात आले.
धावफलक:
डी.ए.आर.सी. (DARC): २० षटकांत १०३/४ (ईशा घुले ७५; अमृता गव्हाणे १/१७).
सोलापूर: १७.२ षटकांत १०४/० (आर्या उमाप ५४, साक्षी वाघमोडे ४१).
निकाल: सोलापूर १० गडी राखून विजयी.

Previous Post

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

Next Post

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

Next Post
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In