सोलापूर : राज्याचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे महिला उपाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सोलापूर शहरातल्या सुशीलकुमार व सुशील या नावाच्या व्यक्तींना मोफत ५०१ रुपये पेट्रोल-डिझेलचा उपक्रम ठेवण्यात आले होते त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
त्या राबवलेल्या कामाचे व मोलाच्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विश्वभुषण कांबळे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आर. बी.दयावान संस्थेचे अध्यक्ष रमाकांत भालशंकर, राहुल युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल दुपारगुडे, सिद्धार्थ कांबळे, अभिनव वाघमारे, आनंद हिप्पर्गे, बुद्धभूषण कांबळे, रविकांत बाळशंकर, विश्वरत्न कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.