सोलापूर : जिल्ह्याचा शनिवार दिनांक 14 ऑगस्ट चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील सध्या एक हजारपेक्षा अधिक कोरोना रूग्णांवर उपचार चालू आहेत . शुक्रवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यामध्ये नवीन 584 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. ६९३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे .तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात 141, करमाळा तालुक्यात 64 , माढा तालुक्यात 84, पंढरपूर तालुक्यात 87 , सांगोला तालुक्यात 96 जणांना बाधा झाली आहे. जिल्ह्यातील म्यूकरमायकोसिसचा एक रुग्ण बरा होऊन रुग्णालयातून घरी परतला आहे.