सोलापूर | मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात आज दिनांक 26.11. 2022 रोजी संविधाना चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या दिनानिमित्त मंडल रेल प्रबंधक श्री नीरज कुमार डोहरे आणि सर्व शाखा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाचे उद्देशिकेचे वाचन केले.
या कार्यक्रमाला अप्पर विभागीय रेल्वे प्रबंधक श्री शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी श्री जी पी भगत, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक व जनसंपर्क अधिकारी श्री एल. के. रणयेवले, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता श्री. संजय साळवे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता श्री. अनुभव वर्षणे , वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त,मंडल कार्मिक अधिकारी श्री. रमेश अय्यर इत्यादि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सोलापूर विभागात अन्य स्टेशन व कार्यालयात देखील सर्व कर्मचाऱ्यांनी आज भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे वाचन केले.