सोलापूर – राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोविड १९ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे सह ४ अधिकारी यांचा गौरव पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते आज करणेत आला. जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीस या सन्मानचिन्हाचे वितरण करणेत आले.
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, महापौर सोलापूर महानगरपालिका श्रीकांचना यन्नम, महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलिस आयुक्त् हरीश बैजल, ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते,अतिरिक्त जिल्हाधिकारीसंजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार व विविध शासकीय कार्यालयातील खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा महाराष्ट्र शासनाकडून प्रशस्तिपत्र पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते गौरव करणेत आला. मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आरोगय अधिकारी,डॉ शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले , रफिक शेख जिल्हा माध्यम अधिकारी या सर्वांचा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर जिल्हयामध्ये कोविड-१९ या राष्ट्रीय अपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानपुर्वक प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्हयामध्ये कोविड-१९ संबंधी नियोजन केलेले होते. त्याच अनुषंगाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सुक्ष्म नियोजन करुन लोकहितास्तव अनेक अभियान ग्रामीण भागामध्ये व त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले यांनी अत्यंत नियोजनबद्ध कोविड-१९ परिस्थिती हाताळून कोविड-१९ ची साथ नियंत्रणाकरिता कामकाज केलेले होते. रफिक शेख जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांनी कोविड-१९ साथजन्य परिस्थितीमध्ये प्रतिबंधात्मक जनजागृती केलेले होते.जिल्हयामध्ये कोविड-१९ चा लढा देण्यासाठी एक उत्कृष्ठ टीमवर्क काम केल्याने शासनस्तरी या कामांची दाद घेऊन पालकमंत्री यांच्या हस्ते गौरवण्यात आले.