मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट होणार आहे, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला तर थंडीपाससून बचाव करण्यासाठी अनेकांनी घेतला शेकोटीचा आसरा घेतल आहे. मुंबईतही गारठा वाढला आहे. उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा प्रकोप आहे. दिल्ली आणि एनसीआरसाठी आजही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणातील तापमानात कमालीची घट झाली आहे. मुंबईतील किमान तापमान घसरलं आहे. तर कोकणातील तापमानाचा पारा घसरला आहे. रत्नागिरीत किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर माथेरानमध्ये तापमान 12 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील तापमानात घट झाली आहे. पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट दिसणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान 10 अंशावर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरल्यामुळे जिल्ह्यात गारठा वाढला आहे. गेले चार पाच दिवस जिल्ह्यात ही स्थिती आहे. थंडी वाढल्यामुळे आंबा, काजूला फायदा होणार आहे. जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढताच ठिकठिकाणी शेकोटी पेटविल्या दिसत आहेत. तर जिल्हयात सर्वत्र पहाटे धुक देखील पसरलेले आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपड्यांचा आणि शेकोटीचा आधार नागरिक घेताना दिसत आहेत.