सोलापूर : महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सोडला असून हा पदभार आता माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे.
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे निलंक्ति झाल्यानंतर त्यांना पदभार उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्याकडील पदभार काढून माध्यमिक शिक्षणाधिकारी मास्ती फडके यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, फडके यांनी माध्यमिकच्या कामाचा भार अधिक असल्याचे कारण देत प्राथमिकचा पदभार घेण्यास नकार दिला होता. शेवटी १८ ऑगस्ट २०२३ रोजी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मिस्कले यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
मिरकले यांनी अल्पावधीत विविध विपय मागी लावले होते. सध्या अंगणवाडी कर्मचान्यांचा संप सुरू असून महिला व बालकल्याण विभागाकडे असणाऱ्या प्रलंबित कामाकडे लक्ष देण्याच्या कारणावरून प्राथमिक शिक्षण विभागाच्या जवाबदारीतून मुक्त करण्याची विनंती त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे त्यांच्याकडील प्राथमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार काढून तो माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी अंधारे यांच्याकडे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे समजते.