माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेने महापालिका आयुक्तांच्या सहकार्याने पाणी संकटावर विजय…

0
11

सोलापूर – माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्था या परिसरात गेल्या चार ते पाच वर्षापासून पिण्याचे पाण्याच्या समस्या होती. त्या परिसरात काही लोकांना पाणी येत होतं तर काही लोकांना पाणी येत नव्हतं यासंदर्भात माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने मा.आयुक्त यांना जनता दरबार मध्ये पत्र दिले होते. या पत्राचे अनुषंगाने महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने त्या ठिकाणी पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत केल्याने व कायमस्वरूपी समस्या सोडवल्यामुळे त्या भागातील नागरिकांनी आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली – उगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सारिका पवार,दिपाली पवार, फरजाना गदवाल, संगीता नेसरीकर, जैनब अलीम, नूरसहा विजापूरे आदी मान्यवर उपस्थित होते