नागपुरात मिरचीच्या गोदामाला आग; १७ कोटींची मिरची जळून खाक

0
10

कृषी उत्पन्न समिती यार्डमधून धूर कृषी उत्पन्न समितीतील एका यार्डमधून धूर निघताना दिसत होता. काही वेळातच आगीचे मोठे लोळ उठू लागले. काही क्षणातच आगीने संपूर्ण परिसर वेढला. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी मिरचीची ५ हजार पोती होती. या मालाची अंदाजे किंमत १७ कोटींच्या आसपास असल्याची माहिती आहे. रात्री अडीचच्या सुमारास लागलेली आग सकाळी ८ वाजेपर्यंत विझवण्याचं काम सुरू होतं. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. साडे सहा ते सात तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.