निधनाची अफवा : विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांकडून उपचार सुरु

0
6

येस न्युज नेटवर्क : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून मिळत आहे. काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या,’ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही.’

विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वृषाली यांनी सांगितलं की, ‘विक्रम गोखले यांच्यावर 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.’