• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना…सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 21, 2024
in मुख्य बातमी
0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना…सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
0
SHARES
0
VIEWS

लाडकी बहीण योजनेतून महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल

सोलापूर : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही महत्वकांक्षी योजना सुरू केली. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथून या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. सोलापूर जिल्ह्यात ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा प्रशासन या योजनेची प्रचार व प्रसिद्धी अत्यंत नियोजनबद्धरित्या करून ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे जिल्ह्यात 6 लाख 14 हजार 700 अर्ज प्राप्त झाले; त्यापैकी 5 लाख 94 हजार 587 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले असून दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. योजनेचे पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा झाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे व उत्सहाचे वातावरण असून राखी पौर्णिमेची ओवाळणी राज्य शासनाकडून प्राप्त झाल्याची भावना अनेक बहिणींनी बोलून दाखवली.

          राज्यातील महिला मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, महिलांना मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थिती सुधारणा करणे हे उद्देश ठेवून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी सुरू करण्याचा निर्णय 28 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार घेतला. व माहे जून 2024 पासून ही योजना संपूर्ण राज्यभरात राबवण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागासह शहरी भागात ही या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत संपूर्ण राज्यभरातून किमान अडीच ते तीन कोटी महिलांना हा लाभ मिळू शकणार आहे. 

        माहे जून 2024 पासून ही योजना संपूर्ण राज्यभरात लागू झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व  जिल्हा प्रशासन ही योजना जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक महिला लाभार्थी पर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे ही योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून मोठ्या प्रमाणावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली. 
        जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात संबंधितांना अर्ज स्वीकृती, ऑनलाईन अर्ज भरणे व प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणे याबाबतचे अत्यंत काटेकोरपणे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सर्व अंगणवाडी केंद्रावर ग्रामपंचायत कार्यालयात योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले. तसेच हे अर्ज नारीशक्ती दूत या संकेतस्थळावरही ऑनलाइन उपलब्ध असल्याचे सर्वांना कळविण्यात आले.

        पंढरपूर येथे 1 जुलै ते 23 जुलै 2024 या कालावधीत होणाऱ्या आषाढी कार्तिकी वारीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर या योजनेची महिला व बाल विकास विभागाच्या वतीने प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच पालखी मार्गावर ही सर्व ठिकाणी योजनेचे बॅनर्स लावून प्रसिद्धी करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर अर्ज भरणे आधार कार्ड अपडेट करणे बँक खाते उघडणे याबाबत शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन तज्ञ प्रशिक्षकाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. मंडल स्तरावर उत्पन्न दाखला, रेशन कार्ड अद्यावत करणे बाबत ही शिबिरे घेण्यात आली. आपले सरकार सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्र यांचेही ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यात आले. 

      जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या योजनेच्या अनुषंगाने सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांचा वारंवार आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना देत होते. सोलापूर जिल्हा या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यस्तरावर अग्रेसर राहिला पाहिजे या दृष्टीने ते प्रयत्न करत होते. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ग्राम पातळीवरील जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांना या योजनेच्या अनुषंगाने अत्यंत कार्यक्षमपणे काम करण्याचे निर्देश दिले. 20 जुलै 2024 रोजी या योजनेचे अर्ज भरून घेण्याच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा घेण्याचे आयोजन करण्यात आलेले होते. महापालिका आयुक्त शितल उगले-तेली यांनी सोलापूर महापालिका हद्दीतील महिलांना या योजनेची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेंनी काम केले. त्यामुळे ही योजना ग्रामीण भागासह शहरी भागातील मोठ्या प्रमाणावर पोहोचून जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांनी या योजनेत अर्ज केले जात आहेत. 

      अर्ज स्वीकारण्याच्या अनुषंगाने आधार स्त्रीलिंग असल्याची खातर जमा करण्याची कारवाई आपले सरकार सेवा केंद्रावरील कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत केले जात आहे या योजनेसाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन केलेल्या आहेत, दर शनिवारी पात्र लाभार्थ्याची यादीचे चावडीवर वाचन करण्यात येत असून अपूर्ण कागदपत्रांची त्रुटीची पूर्तता करून घेण्यात येत आहे. त्यामुळे भरलेल्या अर्जापैकी मंजूर अर्जाची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
Previous Post

बदलापूरची घटना ताजी असतानाच… अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग

Next Post

जय भारत प्राथमिक शाळेमध्ये “स्वातंत्र्य दिन “कार्यक्रम उत्साहात संपन्न

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
जय भारत प्राथमिक शाळेमध्ये “स्वातंत्र्य दिन “कार्यक्रम उत्साहात संपन्न

जय भारत प्राथमिक शाळेमध्ये "स्वातंत्र्य दिन "कार्यक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026