• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वेने आंतर-विभागीय सांस्कृतिक स्पर्धा–२०२५ च्या विजेत्यांना पुरस्कार वितरण..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 20, 2025
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वेने आंतर-विभागीय सांस्कृतिक स्पर्धा–२०२५ च्या विजेत्यांना पुरस्कार वितरण..
0
SHARES
0
VIEWS

महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी आंतर-विभागीय सांस्कृतिक स्पर्धा–२०२५ च्या विजेत्यांना पुरस्कार वितरण केले. मुंबई विभागाच्या सांस्कृतिक पथकाने सर्वोत्कृष्ट एकूण कामगिरीसाठी “सरताज” पुरस्कार पटकावला.

विवेक कुमार गुप्ता, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे तसेच सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमी चे मार्गदर्शक, यांनी दिनांक १९.१२.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या सभागृहात आयोजित आंतर-विभागीय सांस्कृतिक स्पर्धा–२०२५ मधील विजेत्यांना पुरस्कार वितरित केले.सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमी यांच्या वतीने दिनांक १७.१२.२०२५ ते १९.१२.२०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला तसेच, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या पाल्यांचा समृद्ध कलागुण सादर झाला. स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच १९.१२.२०२५ रोजी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

मुंबई विभागाच्या सांस्कृतिक पथकाने विविध प्रकारांमध्ये ४९ गुणांसह ९ पारितोषिके मिळवत सर्वोत्कृष्ट एकूण कामगिरीसाठी “सरताज” पुरस्कार पटकावला. मुख्यालयाच्या सांस्कृतिक पथकाने देखील ९ पारितोषिके मिळवत त्यांचा निकटचा संघर्ष केला.परळ वर्कशॉप आणि माटुंगा वर्कशॉपच्या सांस्कृतिक पथकांनी प्रत्येकी ३ पारितोषिके जिंकली.मुंबई विभागाच्या कलाकारांनी आपली कला सादर करत शास्त्रीय एकल नृत्य तसेच समूह नृत्य या दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले.याशिवाय मुंबई विभागातील विविध कलाकारांनी संगीत, नृत्य, नाट्य तसेच रंगमंचामागील योगदानासाठीही पारितोषिके मिळवली.

मुख्यालयाच्या संघाने “विसर्जन” या सर्वोत्कृष्ट नाटकासाठी प्रथम पारितोषिक पटकावले. त्यानंतर मुंबई विभागाने मराठी नाटक “नाना नव्याणव बाद” तसेच हिंदी नाटक “आधे अधुरे” यांसाठी दोन द्वितीय पारितोषिके मिळवली.मुख्यालयाच्या पथकातील कलाकारांनी संगीत विभागात वर्चस्व राखत शास्त्रीय संगीत गायन, शास्त्रीय संगीत वादन तसेच सुगम संगीत वादन या प्रकारांमध्ये प्रथम पारितोषिके पटकावली. परळ वर्कशॉपच्या कलाकाराने सुगम संगीत गायन प्रकारात प्रथम पारितोषिक मिळवले.आयडीसीसी-२०२५ चे विजेते विविध ठिकाणी होणाऱ्या आंतर-रेल्वे सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मध्य रेल्वेचे प्रतिनिधित्व करतील.

मध्य रेल्वे आंतर-रेल्वे सांस्कृतिक स्पर्धा-नाट्य-२०२५ चे आयोजन करेल.
आंतर-विभागीय सांस्कृतिक स्पर्धा–२०२५ चे उद्घाटन दिनांक १७.१२.२०२५ रोजी प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास अरविंद मालखेडे अध्यक्ष सीआरसीए व प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक तसेच अनुराग मेश्राम उपाध्यक्ष सीआरसीए व मुख्य कार्मिक अधिकारी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

पहिल्या दिवशी एकांकिका नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विविध विभाग व वर्कशॉपमधील पथकांनी एकूण ११ नाटके सादर केली.

दुसऱ्या दिवशी उत्साहपूर्ण संगीत स्पर्धा पार पडल्या, ज्यामध्ये सहभागी कलाकारांनी विविध प्रकारांमध्ये आपले संगीत कौशल्य प्रभावीपणे सादर केले.

तिसऱ्या व अंतिम दिवशी शास्त्रीय एकल नृत्य तसेच लोकनृत्य समूह सादरीकरणे सादर करण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमात रंगत व सांस्कृतिक विविधता आली.

मध्य रेल्वेच्या विविध विभाग व वर्कशॉपमधील सुमारे २५० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, ज्यामुळे हा कार्यक्रम भव्य यशस्वी ठरला. या उपक्रमातून सीआरसीएच्या सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची व रेल्वे कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देण्याची कटिबद्धता स्पष्टपणे दिसून आली.

प्रधान विभागप्रमुख, हिरेश मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग; मुख्यालय व विभागातील अधिकारी व कर्मचारी, तसेच इतर विभागांचे संघ व्यवस्थापक त्यांच्या संबंधित संघ सदस्य व कलाकारांसह या कार्यक्रमास उपस्थित होते.

Previous Post

ऊद्या मतमोजणीसाठी डबल लेयर हाय सिक्युरिटी..

Next Post

उमेदवारांनी देव ठेवले पाण्यात; उद्या जनतेचा फैसला येणार

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post

उमेदवारांनी देव ठेवले पाण्यात; उद्या जनतेचा फैसला येणार

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026