• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2023
in मुख्य बातमी
0
हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या
0
SHARES
0
VIEWS

संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी व इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार हसन यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी व इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ  यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे खोटी व बदनामी करणारी फिर्याद दाखल केल्याचे सांगत ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला. 

सन 2012 ते आजअखेर हा गुन्हा घडल्याची फिर्याद दिली आहे. मुश्रीफ यांनी 2012 मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले व सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

कुलकर्णीं यांच्यासह अन्य सभासदांना महिन्याला पाच किलो साखर, तसेच लाभांश रूपात अन्य आर्थिक लाभ मिळतील, अशी प्रलोभने दाखविण्यात आली. कारखाना सुरू झाल्यावर साखर कार्ड बिगर ऊस उत्पादक या सदराखाली देण्यात आले. विवेक कुलकर्णी व साक्षीदार यांना कोणतीही पावती, शेअर सर्टिफिकेट दिले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता त्यांना सरसेनापती शुगर ‘एलएलपी’ या नावाने पोच पावत्या देण्यात आल्या. ‘नॉन क्युम्युलेटी व प्रेफरेंशियल शेअर्स’ या सदराखाली या पोच पावत्या दिल्याचे दिसून आले. कारखाना उभा करताना रोख, धनादेश स्वरूपात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कागलमधील शाखा क्रमांक एक व दोनमधून त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यक्तिगत तसेच सरसेनापती शुगर पब्लिक लिमिटेड (नियोजित)च्या नावाने आमच्याकडे भाग देतो, असे सांगून पैसे गोळा केलेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

दरम्यान, आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, तसेच काही शेतकरी मुरगूड पोलिस ठाण्याकडे आले. चुकीची व बिनबुडाची तक्रार शहानिशा न करता कशी दाखल करून घेतली, त्यासाठी कोणती कागदपत्रे पुरवण्यात आली, असा जाब सहायक निरीक्षक बडवे यांना विचारला. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. संतप्त कार्यकर्त्यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात हुकूमशाही सुरू झाल्याचा आरोप केला. आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात एक व्यक्ती 40 कोटींची तक्रार करते आणि त्याची शहानिशा न करता गुन्हा दाखल कसा करून घेतात, सर्व 40 हजार शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे काय? 10 ते 15 जण येऊन 40 हजार शेतकऱ्यांची तक्रार कशी देऊ शकतात, असा जाब यावेळी विचारण्यात आला. 

Previous Post

रमेश कदम यांना पोलिसांनी मागणी केलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळली

Next Post

भरधाव ट्रकची तीन बसला धडक, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 50 जखमी; केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या रॅलीहून परतताना अपघात

Related Posts

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
Next Post
भरधाव ट्रकची तीन बसला धडक, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 50 जखमी; केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या रॅलीहून परतताना अपघात

भरधाव ट्रकची तीन बसला धडक, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 50 जखमी; केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या रॅलीहून परतताना अपघात

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026