भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शेकडो प्रवाशांना वाचवले. स्वत:वर चाकू हल्ला होत असतानाही त्यांनी आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावले, हे शौर्य दाखवणारे कॅप्टन आहेत मुंबईचे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह,इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दुबई स्थित भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छारच्या असामान्य शौर्याची प्रशंसा केली आहे.दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात बुधवारी धक्कादायक प्रकार घडला. विमानाच्या कॉकपिटमध्ये ओमानच्या को-पायलटने भारतीय कॅप्टन स्मित मछार यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर विमानाचे नियंत्रण धोक्यात आले. मात्र, जखमी असूनही कॅप्टन मछार यांनी परिस्थिती हाताळत विमानाला अपघातापासून वाचवले. या विमानात 174 प्रवासी आणि विमान कर्मचारी होते. या धाडसी कार्याबद्दल,कॅप्टन स्मित मच्छार यांच जगभरातून होत आहे कौतुक.










