• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2026
in मुख्य बातमी
0
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
0
SHARES
11
VIEWS

SIR(विशेष सखोल पुनरिक्षण) अंतर्गत सर्व बीएलओ यांनी दररोज 100 ते 150 फॉर्म वितरित करावेत

एसआयआर कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ ना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने
या कामाव्यतिरिक्त इतर कोणतीही जबाबदारी देऊ नये

सर्व बीएलओ नी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, जे बी एल ओ SIR चे काम करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल

जिल्ह्याच्या 11 विधानसभा मतदारसंघात एकूण 39 लाख 38 हजार 631 मतदार आहेत, तर 3723 बीएलओ नियुक्त

सोलापूर – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत 39 लाख 38 हजार 631 मतदारांसाठी 3 हजर 723 बीएलओ मार्फत हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तरी सर्व बीएलओनी हे काम एक राष्ट्रीय कर्तव्य समजून अत्यंत काटेकोरपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विषय सकल कार्यक्रम कामकाजाची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांनी घेऊन सर्व संबंधित विभाग प्रमुख मतदार नोंदणी अधिकारी बी एल ओ यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, उपजिल्हाधिकारी अभय भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, सुमित शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, निवडणूक तहसीलदार विभुते, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, माध्यमिक सचिन जगताप, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सीडीपीओ हे ऑनलाइन द्वारे उपस्थित होते.


जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन म्हणाले की, 30 जून पासून आपल्या जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. परंतु 3 हजार 723 पैकी 46 बीएलओ नी प्रशिक्षण घेतलेले नाही. तसेच काही बीएलओ नी इआरओ यांच्याकडून साहित्य घेऊन गेलेले नाहीत. तरी सर्व संबंधित बीएलओ त्वरित प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे व साहित्यही घेऊन जावे. तसेच आपल्या भागात जाऊन दररोज किमान 100 ते 150 एपिक फॉर्म मतदारांना वितरित करावेत, असे सूचना देऊन जे बीएलओ हे काम करणार नाहीत किंवा बी एल ओ नी हे काम करताना त्यांचे वरिष्ठ अडचण निर्माण करत असतील तर अशा संबंधात त्यावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी निर्देशित केले.


सोलापूर जिल्हा हा राज्यात सर्वात जास्त मतदारसंख्या असलेल्या जिल्ह्यात पाचवा जिल्हा आहे. एकूण 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये 39 लाख 38 हजार 631 मतदार आहेत. त्यामुळे सर्व संबंधित बी एल ओ यांनी या कार्यक्रमांतर्गत त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी एक राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडावी. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. तसेच शिक्षण विभागानेही बी एल ओ म्हणून नियुक्त केलेल्या अडीच हजार पेक्षा अधिक शिक्षकांना विशेष सखोल पुरीक्षण कार्यक्रमातिरिक्त कोणत्याही प्रकारची जबाबदारी देऊ नये. पुढील एक महिना याच कामाला अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे. तसेच आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागाने त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना (आशा वर्कर, अंगणवाडी सेविका) यांनाही इतर अधिकचे जबाबदारी देऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले.


प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी अकरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत कशा पद्धतीने काम केले पाहिजे याची सविस्तरपणे माहिती दिली. तसेच रोजच्या रोज बीएलओ यांच्याकडून या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात यावा. मतदार नोंदणी अधिकारी यांना अतिरिक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांची मागणी असेल तर त्याबाबतचे प्रस्ताव त्वरित पाठवण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.

Previous Post

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

Next Post

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026