• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2021
in इतर घडामोडी
0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन
0
SHARES
1
VIEWS

सावित्रीबाई साठे यांची प्रमुख उपस्थिती : लोकशाहिरांच्या सूनेचे जल्लोषात स्वागत

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये बांधण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते रविवारी थाटात करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने होत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यासाठी साठे यांची सून आल्याने सोलापूरकरांनी त्यांचे रांगोळ्यांच्या पायघड्या घालून, ढोल – ताशांच्या निनादात गुलाबपुष्प उधळून स्वागत केले.

पाथरूट चौकाजवळील अण्णाभाऊ साठे नगर, मातंग वस्ती येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख होते. तर महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटोळे, नगरसेवक रवि कैय्यावाले, नगरसेवक राजकुमार पाटील, विजय अडसूळे, संजय साठे, यतिराज अडसूळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी श्रीमती साठे म्हणाल्या, समाजातील प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे. समाजातील शिक्षितांचे प्रमाण वाढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजाला प्रगतीची द्वारे खुली व्हावीत यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत. याप्रसंगी नगरसेवक सुनिल कामाठी यांच्या हस्ते श्रीमती साठे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माजीमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, सुरेश पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मातंग समाजाचे पंच भोलेनाथ साबळे, संभाजी डुकरे, अनिल साठे, दत्ता अडसूळे, बाळू गायकवाड, लालू साठे, सुधाकर अडसूळे, दत्ता कांबळे, विजय अडसूळे, संजय साठे, राम बोराडे, सतिश गायकवाड, राज क्षीरसागर आदी उपस्थित होते.नगरसेवक सुनील कामाठी यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन तर लालू साठे यांनी आभार प्रदर्शन केले.

या असतील सुविधा
७९ लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या दोन मजली सांस्कृतिक भवनामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प साकारण्यात येणार आहे. तसेच प्रशस्त हॉल, कार्यालय, भव्य व्यासपीठ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Previous Post

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने १५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भेट

Next Post

स्व. सुभाष शहा यांना प्रिसिजन परिवाराची आदरांजली

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
स्व. सुभाष शहा यांना प्रिसिजन परिवाराची आदरांजली

स्व. सुभाष शहा यांना प्रिसिजन परिवाराची आदरांजली

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026