• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दहावीच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होणार नाही यासाठी दक्षता घ्या-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2025
in इतर घडामोडी
0
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद
0
SHARES
0
VIEWS

मास कॉपी होणाऱ्या परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकावर व पर्यवेक्षकांवर कठोर कारवाई करावी

सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांनी त्या त्या तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र तसेच कॉपीबाबत तक्रार येणाऱ्या परीक्षा केंद्रावर अधिक लक्ष ठेवावे

जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील 184 परीक्षा केंद्रावर 65,585 विद्यार्थी दहावीच्या परीक्षा देत आहेत

कॉपी, गर्दी व अन्य कारणासाठी जिल्ह्यातील 76 परीक्षा केंद्र संवेदनशील

5 मार्च गणित भाग 1, 7 मार्च गणित भाग 2, 10 मार्च विज्ञान भाग 1 व 12 मार्च विज्ञान भाग 2 असे चार पेपर बाकी

सोलापूर, दिनांक 4(जिमाका):- सध्या दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा सुरू असून बारावीचा एक तर दहावीचे चार पेपर राहिले आहेत. तरी दहावी व बारावीच्या उर्वरित पेपर साठी एकाही परीक्षा केंद्रावर मास कॉपी अथवा अन्य कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार आणि गटशिक्षण अधिकारी यांनी अत्यंत दक्ष राहून परीक्षा सुरळीत पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
दहावी व बारावी बोर्ड परीक्षेच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होऊ नये यासाठी दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की दहावी बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने त्या तक्रारीचे तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आलेले आहे त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेने विशेषत: शिक्षण विभागाने दहावी-बारावी च्या उर्वरित पेपर साठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून संवेदनशील परीक्षा केंद्राबरोबरच अन्य परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरीही परीक्षा केंद्रावर कॉपी होत असल्याचे आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यास जागेवरच निलंबित करावे तर संबंधित परीक्षा केंद्र चालकावर गुन्हे दाखल करून ते केंद्र पुढील कोणत्याही परीक्षेसाठीचे बंदी आदेश काढावेत, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
प्रत्येक उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्या त्या तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र तसेच कॉपीच्या तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्र चालकांना बोलावून त्यांच्या केंद्रावर उर्वरित पेपरसाठी कॉपी होणार नाही याबाबत अत्यंत कठोरपणे निर्देश द्यावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी माळशिरस यांनी शिरपूर येथील परीक्षा केंद्रावर भेट देऊन तेथे कॉपी होत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले होते, त्या केंद्रावरील पर्यवेक्षक तसेच केंद्र चालकावर त्वरित कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कंट्रोल रूमच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सांगोला, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील काही शाळावर कॉपी होत असल्याच्या तक्रारी आलेल्या असून त्याबाबत तपासणी करून पुढील कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दहावी बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील संवेदनशील केंद्र तसेच कॉपी होत असल्याच्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना माहिती देऊन संबंधित केंद्रावर अधिक भरारी पथके तसेच बैठे पथकांची नियुक्ती करण्याबाबत सूचित केले. तसेच पोलीस विभागांनी परीक्षा केंद्र परिसरात 1000 मीटर पर्यंत जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे त्याचे अत्यंत कठोर अंमलबजावणी करण्याबाबत सूचित केले.
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 184 परीक्षा केंद्रावर दहावी व बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू असून 76 परीक्षा केंद्र संवेदनशील असल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांनी सांगितले. दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी जिल्ह्यातील 65 हजार 585 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बारावीचा माहिती तंत्रज्ञान पेपर बाकी असून दहावीचे गणित भाग एक व दोन व विज्ञान भाग एक व दोन असे चार पेपर बाकी असून या सर्व पेपर साठी अत्यंत दक्षपणे कार्यवाही करून परीक्षा सुरळीतपणे पार पाडली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच मास कॉपी करणाऱ्या व परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्या परीक्षा केंद्रावर तसेच केंद्र चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल तर संबंधित पर्यवेक्षक यांना जागेवरच निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील नांदुरे येथील स्टार इंग्लिश स्कूलमध्ये तहसीलदार यांनी तपासणी केली असता फळ्यावर प्रश्नांची उत्तरे लिहून दिली जात असल्याचे निर्देशनास आल्यानंतर संबंधित पर्यवेक्षक यांना त्याच दिवशी निलंबित करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

Previous Post

पंढरपूर येथे पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची उदंड प्रतिसादात सांगता

Next Post

संघर्षातून फुललेले प्रेरणादायी युवानेतृत्व : गणेश कोळी

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
संघर्षातून फुललेले प्रेरणादायी युवानेतृत्व : गणेश कोळी

संघर्षातून फुललेले प्रेरणादायी युवानेतृत्व : गणेश कोळी

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026