मोठ्या भावाच्या मायेच्या छत्राखाली कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेत असतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून समाजकार्यात स्वतःचे वेगळेपण निर्माण करणाऱ्या युवा बांधकाम उद्योजक गणेश कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रावर्गाकडून मांडण्यात आलेला त्यांच्या कार्याचा एक दृष्टिक्षेप…
सोलापूर : मूळचे बार्शी येथील रहिवासी असलेले शंकर पिराजी कोळी आणि सौ. मंगल शंकर कोळी हे दाम्पत्य नोकरीच्या निमित्ताने सोलापुरात येवून स्थायिक झाले. शंकर कोळी मनपा शाळेतून शिक्षक म्हणून कार्यरत होते. दमानीनगर मधील सुंदरबाई डागा शाळेतून ते १९९६ मध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. या दाम्पत्याला दोन मुले, एक मुलगी अशी अपत्ये झाली. मोठा विकास त्यानंतर मुलगी वैशाली आणि सर्वात लहान गणेश. त्याची इतरांसारखं सारखं मोठे होण्याची भावना. शालेय शिक्षणापासूनच इतरांपेक्षा मोठे होऊन काहीतरी वेगळे करून दाखवण्याची भावना असलेला हा मुलगा आपला जीवनात अशा काही गोष्टी करून जातो की त्याचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी होऊन जाते.
वडील शंकर कोळी हे अत्यंत कडक शिस्तीचे आणि सरळमार्गी व्यक्ती म्हणून परिचित होते. साहजिकच त्याकाळी मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाची गुजराण करताना त्यांची कमालीची ओढाताण व्हायची. अत्यंत कठीण परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून आपला व्यवसायात उत्तुंग भरारी घेणाऱ्या विकास आणि गणेश कोळी दोघांविषयी त्यांच्या स्नेही आणि मित्रवर्गाला नेहमीच अभिमान व हेवा वाटतो.
मोठा भाऊ विकास याने आपले शिक्षण पूर्ण करून यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्मेटची एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये पहिली नोकरी सुरुवात केली. यानंतर नॅशनल हायवे मध्ये प्रकल्पाधिकारी असताना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असल्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःच्या बांधकाम विषय व्यवसाय मुंबईत सुरू केला. याच दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेतून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले लहान भाऊ गणेश हे संगमेश्वर महाविद्यालयात दाखल झाले. कला शाखेतून पदवी घेत असतानाच सरकारी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून गणेश यांना संधी मिळाली. शिक्षण घेत असतानाच पंढरपूर येथे ४ वर्षे नोकरी केल्यानंतर पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर गणेश हे भावाच्या मदतीस मुंबईस गेले.

येथून गणेश कोळी यांच्या व्यवसायिक जीवनाची सुरुवात झाली. मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम व्यवसायातील अनेक अनुभव घेऊन तो एक यशस्वी उद्योजक होण्याच्या मार्गावर त्याचा प्रवास सुरू झाला… पुढे एप्रिल २००८ मध्ये आईच्या नात्यातील असलेल्या उस्मानाबाद येथील चि. सौ. कां. रुपाली यांच्यासोबत गणेश यांचा विवाह झाला. पुढे यथावकाश त्यांना प्रांजली परिणीती आणि राजवीर ही अपत्ये झाली. लग्न झाल्यानंतर सोलापूरला परतून नोकरी किंवा छोटा-मोठा व्यवसाय उभारण्याच्या विचारात गणेश कोळी होते. याचवेळीम्हणजे २००९ मध्ये मोठे बंधू विकास कोळी यांनी सोलापुरात गणेश रामचंद्र आपटे या बांधकाम व्यावसायिक फर्म सोबत भागीदारीत जमीन खरेदी करून दोघा भागीदारांनी ‘इंद्रधनू’ या महत्वाकांक्षी वास्तू प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. अर्थात मोठे बंधू विकास यांनी या प्रकल्पासाठी गणेश यांच्यावर जबाबदारी टाकली. बांधकाम क्षेत्राचा कोणताही पूर्वानुभव नसताना गणेश कोळी यांनी अगदी श्रीगणेशा करीत या क्षेत्रात आपले पाय रोवले. या प्रवासात अनेक सुख दुःखाचे क्षण त्याच्या आयुष्यात आले.
दुःखाचे म्हणाल तर त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात त्याचे पितृछत्र हरवले. वडील शंकर कोळी यांचे २००३ मध्ये निधन झाले. अशा काळात त्यांच्या मातोश्री मंगला कोळी यांनी त्यांना आयुष्यातील पुढील काळात अनेक संकटांशी सामना करण्यासाठी प्रेरणा दिली. आईने दिलेला खंबीर साथ यामुळे हे दोघेबंधू आपल्या व्यवसायात यशाची अनेक शिखरे पार करत होती. पुढे बांधकाम व्यवसायात त्यांनी सुखकर्ता डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अनेक टाऊनशिप त्यांनी शहराच्या विविध भागात सुरू केल्या.
शहराचा विकासात एक तरुण उद्योजक म्हणून जसे गणेश कोळी सहभागी झाले. त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली त्याचेच फलस्वरूप म्हणून गणेश कोळी यांना २०१० साली महाराष्ट्र कोळी समाज संघ या संघटनेच्या सोलापूरचे शहर अध्यक्ष पद मिळाले. याच्या माध्यमातून गणेश यांनी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने, मोर्चे, जाहिरसभा आदी कार्यक्रम राबवित प्रश्न ऐरणीवर घेतले. गणेश कोळी यांच्या प्रयत्नातूनच महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती स्थापन करून गेल्या ७ वर्षापासून शहरात मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा केला जातो. शहरातील अनेक सार्वजनिक उत्सव मंडळांच्या सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत सहभागी होणारे गणेश कोळी हे कोळी समाजातील युवकांबरोबरच बांधकाम क्षेत्रातील त्यांच्या कल्पक कार्यातून इतर समाजबांधवांचे देखील ते प्रेरणास्थान बनले आहेत.
शहराच्या विकासात उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याचे स्थान इतरांकरिता प्रेरणादायी होईल, असा आशावाद त्यांच्या सुखकर्ता मित्र परिवाराला वाटतो. अशा या तरुण उद्योजक गणेश शंकर कोळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !












