बसवेश्वर विचार मंचचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; रविवारी पुरस्कार वितरण समारंभ

0
23

सोलापूर, दि.- येथील बसवेश्वर विचार मंचच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारे आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी जाहीर केले आहेत. रविवार दि.3 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वा. बलिदान चौक येथील जैन स्थानकात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांचे हस्ते तर शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योतीताई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पदम राका, राजाभाऊ गांधी,जितू बलदोटा, आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार प्राप्त शिक्षक- सुजाता जुगदार ( मुख्याध्यापिका -छत्रपती शिवाजी प्रशाला), प्रा. डॉ. वनिता सावंत( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर), प्रा. नागनाथ नवगिरे ( छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज), रेखा पेंबर्ती ( मुख्याध्यापिका -दमाणी प्रशाला), प्रा. शावरू जडगे(एस. व्ही. सि. एस.जुनियर कॉलेज), शुभांगी साठे ( मुख्याध्यापिका-लोकमंगल प्रशाला), शांता चव्हाण ( मुख्याध्यापिका -इंदिरा कन्या प्रशाला), पंडित लोभे ( मुख्याध्यापक-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारकल), सौ सुजाता कलशेट्टी ( वीर तपस्वी प्रशाला,भवानी पेठ ), पूनम ठाकुर(आनंदीबाई तगारे बालक मंदिर सेवा सदन सोलापूर ) अनिलकुमार गावडे ( मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे नगर), श्रीशैल गुरव (गणेश विद्यालय बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर), श्रीकांत कांगडे ( राजीव प्राथमिक शाळा बाळे), शिक्षकेतर कर्मचारी – अनिल ढवळशंक (वरिष्ठ लिपिक -दयानंद काशिनाथ आसावा प्रशाला सोलापूर ), सुधाकर कामशेट्टी (लिपिक :हत्तुरे प्रशाला), उमेश मल्लापुरे( प्रयोगशाळा सहाय्यक- सिद्धेश्वर कन्या प्रशाला)

उपक्रमशील शाळा पुरस्कार – 1)-कै. रामगोंडा केंगनाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,कुमठा नाका सोलापूर,2)- व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूल, सोलापूर),3)-डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उर्दू स्कूल, लिमयेवाडी, सोलापूर), 4)-पीर महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, वांगी, सोलापूर)
पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये प्राथमिक,माध्यमिक, जिल्हा परिषद, महापालिका,महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहून समारंभ शोभायमान करावा असे आवाहन मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी केले आहे.