• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी अमाईन्सने बसवलेली विद्युत दाहिनी बंद !

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2024
in इतर घडामोडी
0
बालाजी अमाईन्सने बसवलेली विद्युत दाहिनी बंद !
0
SHARES
1
VIEWS

देखभाल दुरुस्ती कामात महापालिका प्रशासनाची अक्षम्य दिरंगाई !

तातडीने दुरुस्ती करून गैरसोय टाळा ; उद्योजक केतन वोरा यांची मागणी

सोलापूर : बालाजी अमाईन्सच्या वतीने एक कोटी 27 लाख रुपये सीएसआर निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत बसविलेली विद्युत दाहिनी महापालिकेच्या उदासीनतेमुळे बंद अवस्थेत आहे. महापालिकेने तत्काळ विद्युत वाहिनीची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी समाजसेवक तथा उद्योजक केतन वोरा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक उपायोजना करीत असताना इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करण्यासाठी बालाजी अमाईन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून सोलापूर महापालिकेच्या रुपाभवानी स्मशानभूमी येथे अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसविणे व आजूबाजुचा परिसर विकसित करण्यासाठी सुमारे 1 कोटी 27 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी, श्रध्दांजली सभागृह / वेटिंग हॉल (१४मी. x १२मी.), पुरुष व महिला यांच्यासाठी २ स्वतंत्र स्वच्छता गृह युनिट व हातपाय धुण्याकरिता स्वतंत्र हँडवॉश सेंटर, विद्युत दाहिनी परिसरास पूर्ण बंदीस्त करण्यासाठी चेनलिंक फेन्सिग व गेट, विद्युत दाहिनी परिसरात छोटे उद्यान, वृक्षारोपण, अंत्यविधीस उपस्थित नागरिकांना बसण्याकरिता मार्बलचे १७ बाकडे, पूर्ण परिसरास रंगरंगोटी व लाईट फिटींग्ज गुणवत्तापूर्ण, नेटक्या पद्धतीने पूर्ण करून देण्यात आली. बालाजी अमाईन्स कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) हे मोठे काम शहरवासीयांच्या मदतीसाठी महापालिकेस मोलाचे सहकार्य केले आहे.

दरम्यान, बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने येथील विद्युत दाहिनी व सर्व परिसराचे दि. 26 जानेवारी 2022 रोजी लोकार्पण करण्यात आले. महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने विद्युत दाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता दोन वर्षासाठी मनीष इटरप्राईजेस या मक्तेदाराला देण्यात आला. तसा दोन वर्षाचा करारही करण्यात आला.

दरम्यानच्या काळात या देखभाल दुरुस्ती मक्ता कराराची दोन वर्षाची मुदत दि. 5 जानेवारी 2024 रोजी संपली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने येथील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे मात्र गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून येथील विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. दि. 14 मार्च 2024 रोजी अंत्यसंस्कारासाठी तेथे विचारणा केली असता ही मशीन बंद असल्याचे सांगण्यात आले. स्पेअर पार्ट बिघडल्याने मशीन बंद आहे स्पेअर पार्ट मागविण्यात येत आहे. त्यानंतर दुरुस्ती करण्यात येईल, असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. अद्यापही महापालिका प्रशासनाकडून ही विद्युत वहिनी सुरू करण्यात आली नाही.

परिणामी कोट्यावधी रुपयाचा खर्च करून सीएसआर फंडातून बालाजी अमाईन्सने बसविलेल्या मशीनच्या देखभाल दुरुस्ती कडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दुरुस्ती कामासाठी दिरंगाई होत आहे. ही गंभीर बाब आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. महापालिका देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष करत असेल तर कोट्यावधी निधीतून कामे करून काय उपयोग, असा सवाल उद्योजक केतन वोरा यांनी केला आहे. तातडीने महापालिका प्रशासनाने विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि नागरिकांची सोय करावी, अशी मागणीही यावेळी उद्योजक केतन वोरा यांनी केली आहे.

महापालिकेला देखभाल दुरुस्ती जमत नसल्यास मक्तेदार नेमावा

रूपा भवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी
बालाजी अमाईन्सने मागील दोन वर्ष मक्ता दिला होता. त्यामुळे दोन वर्षात कोणतीही अडचण आली नाही. त्याचप्रमाणे महापालिकेला जमत नसल्यास मक्तेदार नेमून त्यांच्याकडून हे काम करून घ्यावे, अशी मागणी उद्योजक केतन वोरा यांनी केली आहे.

Tags: Balaji Amineselectricinstalled
Previous Post

युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप

Next Post

राष्ट्रवादी सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हजारे यांचा सत्कार..

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
राष्ट्रवादी सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हजारे यांचा सत्कार..

राष्ट्रवादी सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हजारे यांचा सत्कार..

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026