सोलापूर : घोंगडे वस्ती नाल्याजवळ अतिक्रमण काढण्याचे काम चालू असताना सोहेल जब्बार पठाण याने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोहेल पठाण याच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार दत्तात्रय दगडू काटे यांनी याबाबत फिर्याद दिली असून पोलीस नाईक पाटील अधिक तपास करीत आहेत.