• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांच्या सात सुत्री कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2025
in इतर घडामोडी
0
सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांच्या सात सुत्री कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
0
VIEWS

कार्यालय परिसर व कार्यालयाची स्वच्छता ठेवावी, तर नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेत करावा

सोलापूर :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकारी यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्ती बाबत 7 सूत्री कार्यक्रम दिला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेखी सूचना यापूर्वीच निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनिस्त कार्यालयात पुढील शंभर दिवसात या सात सुत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महोदयांच्या सात सुत्री कार्यक्रमाची शंभर दिवसात उद्दिष्ट कृतीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कवळे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विना पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसात उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी आपली वेबसाईट अद्यावत करणे, कार्यालय परिसर व कार्यालयाची स्वच्छता करणे, इज ऑफ लिविंग, कार्यालयात अभ्यागतासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, जनतेच्या तक्रारीचा निपटारा वेळेत करणे, गुंतवणूकीस प्रोत्साहन देणे व प्रत्येक अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन दिवस फील्ड व्हिजिटवर जाणे अशा प्रकारची सात सुत्री दिलेली आहे. या सात सूत्री मधील प्रत्येक बाबीवर संबंधित विभाग प्रमुखांनी अत्यंत काटेकोरपणे कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे व हा सात सुत्री कार्यक्रम पुढील शंभर दिवसात यशस्वी होईल यासाठी योग्य अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी दिले. 

   ज्या विभागांनी जिल्हास्तरावर स्वतः संकेतस्थळ निर्माण केलेले असेल तर ते अद्यावत करणे. ज्या विभागाचे संकेतस्थळ मुख्यालय स्तरावरून ऑपरेट केले जाते ते मुख्यालय स्तरावरून होईल परंतु आपल्या जिल्ह्याची माहिती त्यात अद्यावत आहे का याची खात्री संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी. आपले संकेतस्थळ नागरिकांसाठी सहज व सुलभ समजेल अशा पद्धतीने असले पाहिजे याची खात्री करावी. सर्व विभागांनी आपला कार्यालय परिसर स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करावेत तसेच कार्यालयीन स्वच्छता मोहीम हाती घेऊन अभ्यागतांसाठी शौचालये व्यवस्थित असले पाहिजे, त्यात पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे तसेच त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था ही व्यवस्थित असली पाहिजे याची खात्री करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

  कार्यालयातील अभिलेखे व्यवस्थित असले पाहिजेत यासाठी सिक्स बंडल सिस्टीम वापर करावा. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने याच आठवड्यात प्रत्येक कार्यालयातील तीन अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. आपले सरकार पोर्टल वरील तसेच नागरिकांच्या अन्य तक्रारींचा निपटारा वेळेत झाला पाहिजे. प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी तक्रारीचा निपटारा  व्यवस्थितपणे होत आहे का नाही याची खात्री स्वतः करावी. अभ्यागताना भेटण्याचा दिवस व वेळ ठरवून घेऊन त्याचा फलक दर्शनी भागात लावावा. माहे फेब्रुवारी 2025 च्या लोकशाही दिनापासून प्रत्येक विभाग प्रमुखांनी लोकशाही दिनात आपली उपस्थिती लावून आलेल्या तक्रारींचा निपटारा करावा. गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती लवकरच गठित करण्यात येणार आहे. तसेच कार्यालय प्रमुखांनी आठवड्यातून दोन वेळा फिल्ड व्हिजिट करावी व त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवावे अशी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली.

   प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसाच्या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने सात सुत्री कार्यक्रमाची अत्यंत सविस्तर माहिती देऊन प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी करावयाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच लोकसेवा हक्क अधिनियम, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा, माहितीचा अधिकार, कार्यालयीन स्वच्छता, अभयागतांसाठी सोयी सुविधा, कामाच्या ठिकाणी लैंगिक शाळा प्रतिबंध अनुषंगाने समितीची स्थापना आदी बाबीची पूर्तता झाली आहे याबाबतचे प्रमाणपत्र प्रशासनाला 27 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावेत, असेही त्यांनी सूचित केले.
Previous Post

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा- प्र.कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा

Next Post

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026