• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2026
in इतर घडामोडी
0
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
0
SHARES
1
VIEWS

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील कन्नड प्राथमिक शाळेत घडलेल्या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झालेली नसून, सर्व विद्यार्थी व शिक्षकांची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, अक्कलकोटचे गटविकास अधिकारी यांनी स्वतः बबलाद येथील शाळेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शाळेची परिस्थिती, छतावरील प्लास्टरची पाहणी तसेच जखमी विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट केली.”

जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याने सर्व जखमींना उपचारानंतर सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, शाळेत स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर स्लॅब कोसळलेला नसून छतावरील प्लास्टरचा काही भाग खाली पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास शाळेतील विद्यार्थी खेळत असताना छताच्या हुकला साडीची दोरी बांधून झोका तयार करण्यात आला होता. त्यावेळी दोरीला ताण आल्याने छतावरील प्लास्टरचा काही भाग खाली पडला. या घटनेत १३ विद्यार्थी व २ शिक्षक किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बहुतांश जखमींना प्राथमिक उपचारानंतर तातडीने घरी सोडण्यात आले. एका विद्यार्थ्याला उलट्या होत असल्याने खबरदारी म्हणून सीटी स्कॅन करण्यात आला. त्याचा अहवाल सामान्य आल्यानंतर त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला. एका विद्यार्थ्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याने ड्रेसिंग करून त्यालाही घरी सोडण्यात आले.
सध्या एकही विद्यार्थी किंवा शिक्षक रुग्णालयात उपचार घेत नसून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शाळेची इमारत धोकादायक नसल्याचेही सीईओ कुशल जैन यांनी स्पष्ट केले. या शाळेत एकूण १० खोल्या असून, शाळा व्यवस्थापन समितीकडूनही इमारत धोकादायक असल्याबाबत कोणताही अहवाल देण्यात आलेला नव्हता.
मात्र, विद्यार्थ्यांनी छताच्या हुकला साडीची दोरी बांधून झोका खेळणे आणि त्यावर आवश्यक देखरेख न राहणे ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, संबंधित शिक्षकांच्या भूमिकेचीही चौकशी करून नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे.

सध्या एकही विद्यार्थी किंवा शिक्षक रुग्णालयात उपचार घेत नसून सर्वांची प्रकृती उत्तम व स्थिर आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Previous Post

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

Next Post

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026