येस न्युज मराठी नेटवर्क : सरपंच कौशल्या विनायक सुतार यांनी गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण सरपंच म्हणून कार्य करत आहात गावाच्या हितासाठी अजून काय करता येईल याचे मार्गदर्शन आपण गावातील ज्येष्ठांकडून घेतात आपल्या यशस्वी कारकीर्दीमुळ संपूर्ण महाराष्ट्रातून आपणास आदर्श सरपंच म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत आपल्यामुळे कारंबा गावाचा नावलौकिक संपूर्ण राज्यभर होत आहे म्हणूनच आपणास आदर्श सरपंच हा पुरस्कार देऊन गौरव करताना आम्हाला आनंद होत आहे असे सन्मानपत्र देवुन पुरस्कार देताना बचत गट महिला प्रशिक्षिका सुरेखा शिंदे बचत गट अध्यक्ष स्वाती जगताप यांच्या हस्ते देण्यात आला त्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अतुल रोकडे अलीम पठाण निलेश कांबळे समाधान गायकवाड निखिल पाटील विशाल माने आदीजण उपस्थित होते