• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अदानी समुहाचे शेअर्स पुन्हा गडगडले, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2023
in मुख्य बातमी
0
अदानी समुहाचे शेअर्स पुन्हा गडगडले, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर
0
SHARES
1
VIEWS

गौतम अदानी यांनी मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. चालू आठवड्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अदानी शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत.
गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अदानी समुहाला गेल्या दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अदानी समुहाचे शेअर्स शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सलग सातव्या दिवशी घसरले आहेत. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. चालू आठवड्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अदानी शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्येही मोठी घसरण झाली आहे. नवीन रिपोर्टनुसार, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर गेले आहेत.
अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर
आज शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी अदानी कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. गेल्या 5 दिवसांत अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आता गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या टॉप-20 च्या बाहेर पडले असून ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये अदानी आता 22 व्या क्रमांकावर आहेत.
गेल्या 24 तासांत 10.7 अब्ज डॉलरचं नुकसान
अदानींची संपत्ती आता 61.3 अब्ज डॉलरवर घसरली आहे. गेल्या 24 तासांत अदानींना 10.7 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे अनेक वेळा शेअर्सवर लोअर सर्किट लागलं. अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने त्याच्या एकूण संपत्तीतही सातत्याने घट होत आहे.
आज अदानी शेअर्स 35 टक्क्यांनी घसरले
आज शेअर बाजारात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज कंपनीचा शेअर 547.80 रुपयांनी घसरला असून 1,017.45 रुपयांवर व्यवहार करत आहे.
अदानी शेअर्सवर NSE ची देखरेख
NSE ने (National Stock Exchange) अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स नजर ठेवली आहेत. शेअर बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समुहाच्या अदानी एंटरप्रायझेस , अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स या शेअर्सवर अतिरिक्त देखरेख ठेवण्याच्या उपाययोजना (ASM) अंतर्गत करण्यात आल्या आहे. यामुळे अस्थिरता रोखण्यासाठी मदत होईल, अशी NSE ला अपेक्षा आहे.
अदानी समुहाला अमेरिकन शेअर बाजारात झटका
आता अदानी समुहाला अमेरिकन शेअर बाजारातून झटका बसला आहे. अदानी समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 7 फेब्रुवारीपासून डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समध्ये व्यापार करणार नाही. अमेरिकन शेअर बाजार डाऊ जोन्समधील सस्टेनबिलिटी इंडेक्समधून अदानी शेअर्स काढून टाकण्यात आलं आहे.

Previous Post

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार

Next Post

पूजा हेगडेने तिची फॅशनेबल छायाचित्रे पोस्ट करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
पूजा हेगडेने तिची फॅशनेबल छायाचित्रे पोस्ट करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे

पूजा हेगडेने तिची फॅशनेबल छायाचित्रे पोस्ट करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026