अपोलो हॉस्पिटलमध्ये झाली सोलापुरातील 62 वर्षाच्या रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

0
22

मुंबई – नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये सोलापुरातील 62 वर्षाचे गृहस्थ असलेले आणि जलसिंचन विभागातील निवृत्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांच्यावर यशस्वी पद्धतीने यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. अशी माहिती मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर रोहन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांना त्यांच्या मुलानेच आपल्या यकृताचा 60% भाग दान केला. यामुळे दोघांचेही यकृत आता पूर्ववत होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया केली असे रुग्ण अशोक जाधव यांचे चिरंजीव संपत कुमार जाधव तसेच सोलापुरातील आधार हॉस्पिटलचे संचालक डॉ. योगेश राठोड, डॉ. पडसलगीकर उपस्थित होते.