• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकायुक्त विधेयक आज विधानपरिषदेत मांडणार, विधेयक मंजूर होणार की संयुक्त समितीकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष

Yes News Marathi by Yes News Marathi
March 16, 2023
in इतर घडामोडी
0
लोकायुक्त विधेयक आज विधानपरिषदेत मांडणार, विधेयक मंजूर होणार की संयुक्त समितीकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष
0
SHARES
2
VIEWS

भविष्यात जर खुद्द मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रार लोकायुक्तांकडे गेली, तर त्यासाठी काही विशेष अटीशर्ती या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक आज विधान परिषदेत मांडण्यात येणार आहे. विधेयक आज मंजूर होणार की विरोधक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी करणार ते पाहावं लागेल. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं विधेयक आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे भविष्यात जर खुद्द मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रार लोकायुक्तांकडे गेली, तर त्यासाठी काही विशेष अटीशर्ती या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, विधानसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांची मान्यता मिळाली तरच लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करु शकतील.
लोकायुक्त विधेयकाचे ठळक मुद्दे
लोकायुक्तांकडे मुख्यमंत्र्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आल्यास चौकशी सुरु करण्यापूर्वी विधानसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांची मान्यता घ्यावी लागणार
मान्यता असेल तरच चौकशी करता येणार
मुख्यमंत्र्याविरोधातील तक्रार राज्याच्या अंतर्गत सुरक्षेशी किंवा सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित असेल तरच लोकायुक्तांना चौकशी करता येणार आहे
मुख्यमंत्र्याविरोधातील चौकशी पूर्णपणे गोपनीय असेल आणि त्याचा तपशील कोणालाही मिळणार नाही
अशाच प्रकारे मंत्र्यांच्याबाबतीत मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतरच संबंधित मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करण्याची मुभा लोकायुक्तांना असेल
सनदी अधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांची, आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापतींची तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांबाबत सबंधित विभागाचा सचिव आणि मंत्र्यांची पूर्व मान्यता घ्यावी लागणार
चौकशीला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेण्यासाठी संबंधितांना तीन महिन्यांचा कालावधी
चौकशीची पूर्व मान्यता मिळाली नाही तर मात्र अशा तक्रारींची लोकायुक्तांना चौकशी करता येणार नाही
न्यायप्रविष्ट किंवा विधिमंडळाच्या कोणत्याही समितीपुढे सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये लोकायुक्तांना दखल देता येणार नाही
2019 मध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन
30 जानेवारी 2019 रोजी या विषयावर राज्यातील तत्कालीन सरकारविरोधात राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंनी उपोषणही केलं होतं. राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलन करुन यात सहभाग घेतला. त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार एक संयुक्त मसुदा समिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. त्यात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारच्या विविध विभागाचे 5 प्रधान सचिव आणि जनतेचे 5 प्रतिनिधी होते. मसुदा समितीचं काम साडेतीन वर्ष चाललं. मधल्या काळात सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झालं. वेळोवेळी आठवण करुन द्यावी लागली, पत्रव्यवहार करावा लागला होता.
काय आहे लोकायुक्त कायदा?
नवीन लोकाआयुक्त कायद्यात सर्व कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या चौकशीचे अधिकार आहेत. भ्रष्टाचाराच्या तक्रारीबरोबरच सरकारमधील कुप्रशासन, गैरकारभार आणि दप्तर दिरंगाई या सर्व बाबी लोकायुक्तांच्या कक्षेत येतील. त्यामुळे ते कार्यवाही करु शकतील. हा मसुदा करताना कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांच्या लोकायुक्त कायद्यातील चांगल्या मुद्द्यांचाही विचार करण्यात आला आहे. म्हणून आजपर्यंत ज्या काही मोजक्या राज्यांनी कायदे केले त्यापेक्षा महाराष्ट्र राज्याचा कायदा देशातील इतर राज्यांना अनुकरणीय असा ठरणार आहे. सर्व महानगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा लोकायुक्तच्या कक्षेत येतील. खोट्या तक्रारी होऊ नयेत म्हणूनही तरतूद करण्यात आली आहे. खोटी तक्रार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. एकतर्फी कारवाई होऊ नये म्हणून ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्यालाही आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात येणार आहे. सखोल चौकशीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. माहिती अधिकारात माहिती घेता येते. तर लोकायुक्त कायद्यानुसार थेट चौकशी आणि कारवाई करता येईल. लोकायुक्त कायद्यामुळे लोकांना खऱ्या लोकशाहीचा अनुभव येईल आणि सत्तेचं विकेंद्रीकरण होईल.

Previous Post

अपोलो हॉस्पिटलमध्ये झाली सोलापुरातील 62 वर्षाच्या रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Next Post

सोलापूर ते CSMT वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे चालवून सुरेखा यादव ठरल्या भारताच्या पहिल्या महिला लोको पायलट

Related Posts

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद
इतर घडामोडी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

October 21, 2026
सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार
इतर घडामोडी

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

October 21, 2026
कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम
इतर घडामोडी

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

October 21, 2026
पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद
इतर घडामोडी

पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

October 21, 2026
Next Post
सोलापूर ते CSMT वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे चालवून सुरेखा यादव ठरल्या भारताच्या पहिल्या महिला लोको पायलट

सोलापूर ते CSMT वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे चालवून सुरेखा यादव ठरल्या भारताच्या पहिल्या महिला लोको पायलट

ताज्या बातम्या

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026