राजाने राज्याची संपत्ती सांभाळावी – सुशील कुलकर्णी

0
10

अरविंद झवेरी स्मृती व्याख्यानमाला

सोलापूर : राज्यकर्त्यांनी राज्य सांभाळत असताना आपल्या ताब्यातील राज्याची संपत्ती सांभाळली पाहिजे. राजा जर मुक्त हाताने दान करत राहिला तर ते राज्य रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्राच्या भल्यासाठी ईश्वराची प्रार्थना करणे गरजेचे आहे. माणसाला देव दिसला की त्याचा मोह कमी होतो. राजा हा त्याच्या व्यक्तिगत आयुष्याकडे न बघता राज्यकारभार सांभाळत असतो. व्यापार करताना सत्य, सातत्य, सचोटी आणि संयम असणे गरजेचे आहे. असे मत सुशील कुलकर्णी यांनी’ धर्म नव्हे राष्ट्रधर्म ‘या विषयावर बोलताना व्यक्त केले.

सोलापूर गुजराती मित्रमंडळाचे सदस्य स्वर्गीय अरविंद झवेरी यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानमालेमध्ये दुसरे पुष्प गुंफताना कुलकर्णी हे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयेश पटेल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मुकेश मेहता यांनी प्रास्ताविक केले. सीए राजन रिसबूड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विजय पटेल, गणेश गोरडिया पटेल, कांतीभाई पटेल, मितेश पंचमीया, जगदीश पटेल, ,जितू पटेल, संजय शाह, हितेंद्र वोरा, केतन वोरा , श्रीमती नैनाबेन शहा, कल्पेश झवेरी, अक्षय झवेरी ,हसुमती झवेरी, किशोर चांडक, अण्णासाहेब कोतली, बी. एस. बिराजदार आदीसह सभासद व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बॉलीवूड मध्ये गुजरातीचे मोठे योगदान
बॉलीवूडमध्ये गुजराती लोकांचे सिनेमाच्या निर्मितीपासून ते कलाकारापर्यंत मोठे योगदान आहे. चित्रपट, निर्माता ,पटकथा, लेखक, दिग्दर्शक या जबाबदाऱ्या सांभाळत अर्थ पुरवठा करण्यामध्ये गुजराती लोकांनी बॉलिवूडला मोठे योगदान दिले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या सिनेमाला एका गुजराती व्यक्तीने फायनान्स केला होता. असे मत प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पटकथा लेखक व दिग्दर्शक संजय छेल् यांनी व्यक्त केले.ता. असे मत प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पटकथा लेखक व दिग्दर्शक संजय छेल् यांनी व्यक्त केले.