G20 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील महिलेला मिळाली स्टॉल मांडण्याची संधी

0
21

G20 शिखर परिषद कार्यक्रम दिल्ली येथे महाराष्टातून सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील सौ अनिता योगेश माळगे व रायगड जिल्ह्यातील सौ भारती कातकरी यांना ज्वारी व नाचणी millet पदार्थांची स्टॉल लावण्याची संधी मिळाली व या प्रदर्शनामध्ये देशपातळीवरील पंतप्रधान व त्यांच्या पत्नी व राष्ट्रपती यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला.

यावेळी त्यांचे सत्कार करण्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला यावेळी सौ अनिता माळगे यांनी जय महाराष्ट्र म्हणत ब्रिटनचे पंतप्रधानच्या ऋषी सोनक यांच्या पत्नी व इटली च्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांना millet बॉक्स देऊन सत्कार करण्यात आले याबरोबरच परराष्ट्रमंत्री यांच्या पत्नी मिस जयशंकर व जागतिक बँकेचे ceo यांचे देखील स्वागत करण्याचा योग महाराष्ट्राला मिळाले आपल्या सोलापूरच्या ज्वारीच्या भाकरी व चकली बिस्किटे इ चे आस्वाद घेतले.