• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 3, 2026
in Blog
0
आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग या महत्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

राज्यातील आरोग्यविषयक माहितीचे केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी प्रभावी वापर व्हावा, यासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्री उपक्रमांचे कौतुक केले.

डेटावर आधारित निर्णयांसाठी एकात्मिक डॅशबोर्ड

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 हून अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरील महत्त्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. माता व बाल आरोग्य, क्षयरोग नियंत्रण, असंसर्गजन्य आजारांची तपासणी आदी कार्यक्रमांशी संबंधित प्रमुख निर्देशांकांचे राज्य तसेच जिल्हानिहाय विश्लेषण या डॅशबोर्डवर करता येणार आहे. यामुळे आरोग्यविषयक आव्हाने तातडीने ओळखणे, जिल्हानिहाय कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि आवश्यक ठिकाणी परिणामकारक उपाययोजना करणे अधिक सुलभ होणार आहे. आरोग्यविषयक माहितीचे रूपांतर कृतीयोग्य डेटामध्ये होऊन प्रशासकीय निर्णय अधिक अचूक आणि गतिमान होणार आहेत.

नागरिकांशी थेट संवादासाठी एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र

एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या दूरध्वनींसह आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या संपर्क कॉल्सचेही या केंद्रामार्फत नियोजन करण्यात येणार आहे. अतिजोखमीच्या गर्भवती माता, प्रसूतीनंतरच्या माता, क्षयरुग्ण तसेच असंसर्गजन्य आजारांशी संबंधित नागरिकांचा पाठपुरावा करण्याबरोबरच रुग्णालयातील सेवांविषयी नागरिकांचे अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. या केंद्रात दैनंदिन सुमारे एक हजार कॉल्स हाताळण्याची व्यवस्था असून त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर्स कार्यरत राहणार आहेत. गंभीर अथवा तातडीच्या प्रकरणांची माहिती संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना तत्काळ कळविण्याची यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे.

आरोग्य संस्थांच्या गुणवत्तावाढीसाठी स्टार रेटिंग

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या सेवांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्तावाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. विशेष सेवांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, सुविधांची उपयुक्तता आणि रुग्णांचे अभिप्राय अशा विविध निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळेल. शिवाय, या व्यवस्थेत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीवर आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर तातडीने कार्यवाही करण्याची तसेच त्यानंतर नागरिकांशी संपर्क साधून सेवा मिळाल्याची खात्री करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सेवा दिली का, यासोबतच सेवा मिळाली का, यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

महा पल्स एआयसाठी कोल्हापूर पथदर्शी प्रकल्प

महा पल्स एआयसाठी कोल्हापूरची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, यामुळे येथील आरोग्य व्यवस्था स्मार्ट होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 104 शासकीय आरोग्य संस्था आणि 12 तालुक्यांना एका एकात्मिक डिजिटल प्रणालीशी जोडण्याच्या या उपक्रमामुळे आरोग्य सेवांचे निरीक्षण, उपलब्ध संसाधनांचे व्यवस्थापन आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा पाठपुरावा अधिक प्रभावी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Next Post

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

Related Posts

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद
Blog

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते
Blog

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!
Blog

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026
वैद्यकीय शिक्षण श्रीमंतांची मक्तेदारी?
Blog

वैद्यकीय शिक्षण श्रीमंतांची मक्तेदारी?

September 1, 2026
जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे
Blog

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू
Blog

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
Next Post
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026