• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काश्मीरमध्ये फुललं कमळ

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2020
in मुख्य बातमी
0
काश्मीरमध्ये फुललं कमळ
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यंदा प्रथमच झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुकीत फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील गुपकर आघाडीला मोठं यश मिळालं आहे. एकूण २० जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या या निवडणुकीत गुपकर आघाडीने १३ जिल्यांमध्ये विजय मिळवला आहे. गुपकर आघाडीत सात पक्ष असून काँग्रेसचाही समावेश आहे. दुसरीकडे भाजपाने सहा जिल्ह्यांमध्ये विजय मिळवला आहे.

गुपकर आघाडीत मुख्यत्वे जम्मू काश्मीरमधील स्थानिक पक्षांचा समावेश आहे. यामध्ये राजकीय प्रतिस्पर्धी असणारे नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचाही समावेश आहे. गुपकर आघाडीने १०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे भाजपा ७४ जागांसहित सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने २६ जागांवर विजय मिळवला आहे.

२० जिल्ह्यात प्रत्येकी १४ जागांवर अशा पद्दतीने एकूण २८० जागांसाठी ही निवडणूक पार पडली असून निकाल घोषित करण्यात आले आहेत. अपेक्षेप्रमाणे आघाडीने काश्मीमध्ये विजय मिळवला असून भाजपाने जम्मूमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत.

काश्मीरमध्ये गुपकर आघाडीने ७२ जागांवर विजयी मोहोर उमटवली असून भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. आघाडीने नऊ जिल्ह्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे श्रीनगर जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतल्याने तेथील चित्र स्पष्ट नाही.

जम्मूबद्दल बोलायचं गेल्यास भाजपाने ७१ जागा मिळवल्या आहेत. उधमूपर, सांबा, कठुआ अशा ठिकाणी भाजपा विजयी झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने ४५ जागा जिंकल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने आफल्या अनेक नेत्यांना निकालाआधी ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे.

दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असलेला पीडीपीचा युवक अध्यक्ष वाहीद पारा हा मंगळवारी जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत पुलवामा जिल्ह्य़ातून विजयी झाला. पारा याने भाजपचे उमेदवार साजद अहमद रैना यांचा पराभव केला.

भाजपाने पहिल्यांदाच काश्मीरमध्ये मिळालेल्या विजयावर प्रतिक्रिया देताना ही बदलाची लाट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या तीन उमेदवारांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचा पराभव केला आहे.

“जम्मू काश्मीरमधील लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर विश्वास असल्याचं सिद्ध होत आहे,” असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी मात्र या निकालांवरुन जम्मू काश्मीरमधील जनतेने ३६० कलम हटवण्याच्या निर्णयाला धुडकावून लावल्याचं सिद्ध होत असल्याचं सांगितलं आहे.

Previous Post

शरद पवार देणार नेतेमंडळींसाठी कानमंत्र

Next Post

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

Related Posts

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
Next Post
दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

ताज्या बातम्या

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026