• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 26, 2026
in मुख्य बातमी
0
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
0
SHARES
1
VIEWS

कुठेही अनुचित प्रकार न घडता सोलापूरसह राज्यभरात काल गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या. सोलापूरच्या मानाच्या आजोबा गणपतीचे आज सकाळी साडेसात वाजता सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट या ठिकाणी विसर्जन झाले. पोलीस,महापालिका तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी कौतुकास्पद काम केले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करत रात्री बारा वाजता सर्वच मंडळाचे साऊंड बंद झाले. सोलापूरच्या या गणेशोत्सव मिरवणुकीतील दोन कौतुकास्पद आणि दोन चिंताजनक बाबी आज येस न्यूज मराठी च्या माध्यमातून दर्शकांसमोर मांडत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉल्बी आणि डीजेला फाटा देऊन सर्वच मंडळांनी पारंपारिक वाद्ये वाजवून गणरायाला निरोप दिला. बहुतांश मंडळांचा लेझीमवर भर होता. दुसरी चांगली बाब म्हणजे दरवर्षी शेकडो क्विंटल निर्माल्य पाण्यात टाकून गणेश भक्त जलप्रदूषण करत होते यंदा मात्र महापालिका आणि धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या टीमने जोरदार काम करून शेकडो क्विंटल निर्माल्य संकलित केले. यातून खत निर्मिती केली जाणार आहे हे कौतुकास्पद.

चिंता करायला लावणारी एक बाब म्हणजे गुलाल उधळण्याचा अतिरेक. थेट मशीनच्या साह्याने गुलाल उधळणे आणि प्लास्टिकच्या कागदाचे लहान- लहान तुकडे हवेत उडविणाऱ्या मशीनचा मिरवणुकीत वापर केल्यामुळे हवेत खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले. आज सकाळी मिरवणूक मार्गावरील स्वच्छता करताना महापालिकेच्या टीमची चांगलीच दमछाक झाली. खड्डे पडलेल्या रस्त्यावर गुलालाचे आणि प्लास्टिक तुकड्यांचे थरच्या थर लागल्यामुळे डांबरी रस्ते लालेलाल झाले होते. शिवाय चौका चौकात भले मोठे उभारलेले डिजिटल सगळ्यांनाच अडथळा ठरत होते. सार्वजनिक उत्सव साजरा करताना त्याचा इतरांना त्रास होणार नाही याचे भान सर्वांनीच ठेवावे लागणार आहे.

Previous Post

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

Next Post

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Related Posts

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
Next Post
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026