• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 14, 2026
in इतर घडामोडी
0
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर- गेल्या 24 वर्षांची परंपरा कायम राखत इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने 25 व्या वर्षी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले.घोडे असलेल्या व सुंदर सजवलेल्या रथातून श्री गणरायाची मिरवणूक दावत चौकापासून सुरु झाली. पतंजली मार्ट, गोविंदश्री, डी-मार्ट या मार्गाने येऊन ही मिरवणूक शाळेत संपन्न झाली.मिरवणुकीच्या सुरुवातीला आमदार सुभाषबापू देशमुख, पोलिस उपायुक्त प्रितम यावलकर व इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी , इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे चेअरमन अमोल जोशी , इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे डायरेक्टर सायली जोशी यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले.

उत्तम गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्याबरोबरचे आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने कायम ठेवले आहे.इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड, सीबीएसई, मॉडेल पब्लिक स्कूलमधील इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी ढोल सादरीकरण केले. नऊवारी साडी, फेटा, महाराष्ट्रीयन साज घातलेल्या विद्यार्थिनींनी तसेच पारंपारिक वेशभूषा केलेल्या व फेटे बांधलेल्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना म्हणत गपणती बाप्पा मोरयाच्या गजरात पुणेरी ढोल पथकाचे अप्रतिम सादरीकरण केले.

पुणेरी ढोल पथकामध्ये नऊवारी साडीतील पारंपारिक वेशभूषा केलेल्या व लाल रंगाचा फेटा घातलेल्या विद्यार्थिनी शोभून दिसत होत्या.इंडियन मॉडेल स्कूल सी.बी.एस.ई.व मॉडेल पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला. तसेच इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी कमळ, स्वस्तिक या आकारांमध्ये झांज व झेंडा सादरीकरण केले. आपल्या पारंपारिक मैदानी खेळांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी, मल्लखांब अशा विविध खेळांचे प्रदर्शन मॉडेल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले.

दावत चौकापासून पतंजली मार्ट, गोविंदश्री, डी.मार्ट या मार्गाने इंडियन मॉडेल स्कूल येथे श्री गणरायाची प्रतिष्ठापना आरती होऊन विसर्जित झाली.या मिरवणूकीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री. विजय कबाडे सर, पोलीस उपायुक्त वृष्टी जैन,पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण या मान्यवरांनी मिरवणूकीमध्ये उपस्थिती लावून श्रीं ची पूजा केली व मिरवणुकीची शोभा वाढवली.

शाळेत आल्यानंतर गणरायाची प्रतिष्ठापना व पूजा आमदार देवेंद्रजी कोठे व मोनिका कोठे तसेच पोलिस आयुक्त एम. राजकुमार आणि डॉ. रम्या कन्नन यांच्या हस्ते संपन्न झाली.या मिरवणुकीची संकल्पना इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे डायरेक्टर सौ. सायली जोशी मॅडम यांची आहे. या मिरवणुकीमध्ये 510 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

प्रशालेतील या वर्षीचे आकर्षण केरळमधील तिरुअनंतपुरम येथील सुप्रसिध्द श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा अतिशय भव्य देखावा इंडियन मॉडेल स्कूल येथे उभा करण्यात आला आहे. 30 फूट लांबीची श्री पद्मनाभ स्वामींची मूर्ती प्रशालेतील कला शिक्षकांनी तयार केली आहे. मूळ मंदिराप्रमाणे इथेही ती दरवाज्यांमधून या मूर्तीचे दर्शन घडते. कलाशिक्षक अनिल रॉय, शैलेश कुलकर्णी, निलेश क्षिरसागर, राधिका देवनपल्ली, दिपक पाटील यांना प्रतिकृती तयार करण्याचे श्रेय जाते. विद्यार्थ्यांमध्ये इंडियन मॉडेल स्कूल नेहमीच आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून विविध पौराणिक देखावे दरवर्षी उभे करते. इंडियन मॉडेल स्कूलच्या पुणे व मुंबई येथील शाळांमध्ये सुद्धा अष्टविनायक व शनिवार वाडा या कलाकृती उभ्या केलेल्या आहेत.

गेली 25 वर्ष डीजेमुक्त, डॉल्बीचा वापर न करता फक्त पारंपारिक वाद्यांची मिरवणूक इंडियन मॉडेल स्कूल तर्फे उत्साहाने साजरी केली जाते व याद्वारे ध्वनी प्रदूषण करू नये हा संदेश विद्यार्थ्यांना दिला गेला.यावेळी इंडियन मॉडेल स्कूल्सच्या प्राचार्या अपर्णा कुलकर्णी, ममता बसवंती, अचला राचर्ला, आदिती कुलकर्णी, सुजाता बुट्टे, मानसी जोशी, स्वाती कारंडे, गौरी दातार, रुही काझी, अक्षया कुलकर्णी, ए. डी. जोशी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण देशपांडे व मनोज साळुंखे उपस्थित होते.

ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशांत पुणेकर, राहुल बिटोडकर, अभिजीत सोनके, नितीन बिराजदार, रमेश अंजिखाने, सुनील फुलवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous Post

देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन

Next Post

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

Related Posts

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
Next Post
सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!

पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!

November 2, 2026
उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!

उजनी धरण परिसरातील 568 एकर जमीन दिली सोलर पार्कसाठी …!

November 1, 2026
सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?

सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?

November 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026