सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिभावाने मंगलमय आगमन झाले. देवकर कुटुंबीयांच्या वतीने सहकुटुंब श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून पूजा-अर्चा करण्यात आली.
बाप्पाच्या आगमनाने देवकर यांच्या निवासस्थानी आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत त्यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.यंदाचा गणेशोत्सव भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करण्याचे आवाहन ज्ञानेश्वरी देवकर यांनी केले आहे. मातीची गणेशमूर्ती, घरच्या घरी विसर्जन तसेच ‘वृक्ष विनायक’ संकल्पनेतून गणपतीसोबत एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो, तसेच सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हरित, स्वच्छ आणि सुंदर वातावरण निर्माण होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.











