शिवछत्रपती शिक्षकेतर संघटनेचे यश
सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा परिचारांना शिपायाची कामे लावली जात होती. शिपायांचा गणवेश देखील परिधान करायला लावून संस्थापक – मुख्याध्यापक हे वैयक्तिक मोलमजुरीची कामे देखील करून घेत असत.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षकेतर संघटनेने वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा करून या सर्व कामातून प्रयोगशाळा परिचारांची सुटका केली.
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी यासंदर्भात पत्र काढून प्रयोगशाळा परिचारांना न्याय मिळवून दिला.त्याबद्दल संघटनेच्या वतीने देखील त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश बिडवे तसेच माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद मसरे यांनी विभागीय अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा परिचारांना हा न्याय मिळवून दिला.
बहुतांश माध्यमिक शाळा या खाजगी संस्थेच्या आहेत.
खाजगी संस्थेमध्ये प्रयोगशाळा परिचारांची नेमणूक करून त्यांच्याकडून शिपायाची कामे करून घेतली जातात तसेच वर्गाची देखील जबाबदारी दिली जाते. इतकेच नव्हे तर प्रयोगशाळा परिचारांना संस्थापक – मुख्याध्यापकांंचे खाजगी कामे, घरगुती कामे, शेताची कामे देखील करावे लागत असे.
या अन्यायाविरुद्ध परिचारांनी सोलापूर जिल्हा प्रयोगशाळा संघटनेकडे दाद मागितली परंतु या संघटनने याबाबत सहकार्य केले नाही.
शेवटी अन्यायग्रस्त शाळा परिचारक यांनी बिडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वारंवार शिक्षणाधिकांर्यासोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला. याबद्दल नागेश बिडवे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.











