मागील सर्व कुंभमेळ्यांचा विक्रम मोडणार
नाशिक : २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल ₹३५ हजार कोटींच्या पायाभूत विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मागील १२ वर्षांत देशात झालेल्या सहा कुंभमेळ्यांवरील एकूण खर्चापेक्षाही हा खर्च अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या निधीपैकी सर्वाधिक ५१ टक्के रस्ते विकासासाठी खर्च केला जाणार असून, साधुग्राम, पूल, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, घाट विकास आणि सुरक्षा व्यवस्थेवरही मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. कुंभमेळ्यात सुमारे १२ कोटी भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे, २०२५ च्या प्रयागराज महाकुंभासाठी सुमारे ₹७,३०३ कोटींचा सरकारी खर्च झाला होता. त्या तुलनेत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रस्तावित खर्च जवळपास पाचपट अधिक आहे.










