• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!
0
SHARES
3
VIEWS

शासनाचा पगार व धर्मांतराचा अड्डा; फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? – हिंदू संघटनांचा सवाल

सोलापूर : बापूजीनगर येथील म्हाडा संकुलातील समाजमंदिरात गेली २५ वर्षे राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर चर्चवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अखेर सील ठोकले आहे. हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या धडक कारवाईचे स्वागत केले आहे; मात्र केवळ वास्तू सील करून हा विषय संपत नसून, हिंदू आरक्षणाचा लाभ घेऊन राज्य शासनाची घोर फसवणूक करणारा आणि या धर्मांतर रॅकेटचा मुख्य सूत्रधार ख्रिश्चन पास्टर दत्तात्रय कानेपागूल उर्फ येहान मार्क याला बेड्या कधी ठोकणार, असा खडा सवाल हिंदु संघटनांनी प्रशासनाला विचारला आहे. आज सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही संतप्त मागणी करण्यात आली.

सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेतला रवी गोणे- शहर अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना, आनंद मुसळे- शहर संघटक, हिंदु राष्ट्र सेना, प्रकाश आसादे- हिंदु राष्ट्र सेना, राजन बुणगे- सोलापूर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, वर्षा जेवळे- सोलापूर, हिंदु जनजागृती समितीआणि अधिवक्ता चंद्रशेखर वारद राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती हे उपस्थित होते.

दत्तात्रय कानेपागूल हा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कारकून म्हणून कार्यरत आहे. त्याने ‘हिंदू मोची’ या जातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी लाटली. मात्र, प्रत्यक्षात ख्रिश्चन धर्म स्वीकारून तो ‘येहान मार्क’ या नावाने ‘जिजस गॉस्पल सोसायटी’ या चर्चचा पास्टर म्हणून धर्मांतराचे उद्योग चालवत आहे. हा प्रकार म्हणजे केवळ राज्य शासनाचीच नव्हे, तर खऱ्या मागासवर्गीयांच्या हक्कांची घोर फसवणूक आहे. त्यामुळे या बोगस कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून कायमचे बडतर्फ करावे; तसेच त्याने आतापर्यंत लाटलेला पगार आणि सर्व शासकीय सवलती त्याच्याकडून चक्रवाढ व्याजासह वसूल कराव्यात, अशी भूमिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

कारवाईची कुणकुण लागताच या मंडळींनी प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी रातोरात चर्चवरील क्रॉस काढून पुरावा नष्ट करण्याचा दांभिक प्रकार केला आहे. शासकीय वास्तूचा बेकायदेशीर वापर करण्यासोबतच, कानेपागूल याने तिथे ध्वनिक्षेपक लावून हिंदू देवी-देवतांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिंगलटवाळी केली. यामुळे परिसरात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्यात आली. भोळ्याभाबड्या गरीब हिंदूंची फसवणूक करण्यात आली. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत प्रशासनाने त्याच्यावर आणि ‘जिजस गॉस्पल सोसायटी’च्या पदाधिकाऱ्यांवर माहिती लपवणे, पुरावा नष्ट करणे यासह नवीन ‘भारतीय न्याय संहिता’, ‘धर्मांतर विरोधी कायदा’ आणि ‘अनुसूचित जाती पडताळणी कायद्या’नुसार तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच, भाडेकरारातील अटींचा उघडभंग केल्याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी ‘जिजस गॉस्पल सोसायटी’ची (नोंदणी क्र.: F-15287) ट्रस्ट मान्यता तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

भोळ्या आणि गरीब हिंदूंना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतराच्या जाळ्यात ओढणाऱ्या या मोठ्या षडयंत्रामागे नेमके कोण आहे आणि यासाठी पैसा कुठून येत आहे, याची राज्य शासनाने सखोल चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच राज्यभरात इतरत्र कुठेही समाजमंदिरांचा असा गैरवापर होत असल्यास त्याचीही तातडीने चौकशी व्हावी. प्रशासनाने पास्टर दत्तात्रय कानेपागूल याला पाठीशी न घालता तात्काळ अटक करावी, अन्यथा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना व अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या वेळी देण्यात आला.
Previous Post

सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’

Next Post

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

Related Posts

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
इतर घडामोडी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.
इतर घडामोडी

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.

September 4, 2026
SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
Next Post
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026